शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पेरणी: कोरोनातही भाजप -राष्ट्रवादीने साधली लोक संपर्काची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 13:08 IST

अहमदनगर : कोरोना लॉकडाऊनच्या काळात राजकीय पक्षांनी लोक संपर्काची संधी शोधली आहे़  भाजप व राष्ट्रवादीने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लावले असून, नगर जिल्ह्यात दोन्ही पक्षांनी साखर पेरणी सुरू केली आहे़  त्यामुळे कोरोनाच्या महामारीतही जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे़  

अण्णा नवथर

अहमदनगर : कोरोना लॉकडाऊनच्या काळात राजकीय पक्षांनी लोक संपर्काची संधी शोधली आहे़  भाजप व राष्ट्रवादीने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लावले असून, नगर जिल्ह्यात दोन्ही पक्षांनी साखर पेरणी सुरू केली आहे़  त्यामुळे कोरोनाच्या महामारीतही जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे़  

भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र १ कोटी घरात पोहोचविण्याचे उदिष्ट ठेवले असून, नगर जिल्ह्यातील खासदार, आजी-माजी आमदार, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामार्फत घरोघरी जाऊन पत्राचे वाटप केले जात आहे़  राष्ट्रवादीने अभियप्राय मागविण्याची मोहीम जिल्ह्यात हाती घेतली आहे़  राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी बुथ स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अभियप्राय नोंदविण्याचे आवाहन केले आहे़ राष्ट्रवादीचे हे अभियान २५ जून पर्यंत सुरू राहणार आहे़.

 या काळात राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आॅनलाईन अभिप्राय नोंदवायचा आहे़  ही मोहीम हाती घेऊन राष्ट्रवादीने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याचा प्रयत्न चालविला आहे़  भाजपने तर कार्यकर्त्यांना उदिष्ट दिले असून, त्याचा दररोज आढावा घेतला जात आहे़  त्यामुळे भाजपचे जिल्ह्यातील आमदार, खासदार, माजी आमदार, महापौर, नगराध्यक्ष नगरसेवक कामाला लागले आहेत़कोरोना आणि त्यापाठोपाठ सुरू झालेल्या पावसामुळे जिल्ह्यासमोर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत़ शेतकºयांना वेळेवर कर्ज मिळत नाही़  कोरोनाच्या उपाययोजनांसाठी सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील इतर प्रश्न तुंबले आहेत़  या प्रश्नावर अवाज उठविण्याचे काम विरोधकांचे आहे़ परंतु, विरोधी भाजपही संपर्क करण्यात व्यस्त असून, जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे़  राजकीय पक्षांचे हे संपर्क अभियान सध्या राजकीय वतुर्ळातील चचेर्चा विषय ठरला आहे़