शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय वादात नगरसचिवांची उचलबांगडी

By admin | Updated: August 11, 2016 01:11 IST

अहमदनगर : सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील गटनेते नियुक्तीच्या राजकीय वादात महापालिकेचे नगरसचिव मिलिंद वैद्य यांची अखेर नगरसचिवपदावरून उचलबांगडी करण्यात आली.

अहमदनगर : सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील गटनेते नियुक्तीच्या राजकीय वादात महापालिकेचे नगरसचिव मिलिंद वैद्य यांची अखेर नगरसचिवपदावरून उचलबांगडी करण्यात आली. दरम्यान, वैद्य यांनी जाता जाता सुवेंद्र गांधी (भाजप), संपत बारस्कर (राष्ट्रवादी) आणि सुवर्णा कोतकर (काँग्रेस) यांची नियुक्ती करून गटनोंदणीच्या वादाला आणखी फोडणी दिली आहे.महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी झालेल्या विशेष सभेत गटनेतेपदावरून गोंधळ झाला होता. तसेच पक्षीय बलाबलाचाही वाद उपस्थित झाला होता. याच गोंधळात महापौरांनी शिवसेनेला साथ देणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांची स्थायी समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. याविरोधात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे. संबंधित पक्षाच्या नगरसेवकांचा दबाव असल्याने स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती करण्याच्यावेळी एकाच रात्रीतून गटनेते बदलण्याचा चमत्कारही वैद्य यांनी केला. नाशिक विभागीय आयुक्तांनी नव्याने गटनोंदणी होत नसल्याचे पत्र महापालिकेला पाठविले, मात्र ते पत्रच वैद्य यांनी गायब केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या पत्रासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी त्यांना पळविले होते. विभागीय आयुक्तांचे पत्र मिळाल्यानंतर वैद्य यांनी संपत बारस्कर, सुवर्णा कोतकर, सुवेंद्र गांधी हेच गटनेते असल्याचे त्यांना पत्र दिले आहे. दरम्यान, गटनेते निवडण्याचा अधिकार नगरसचिवांना नसून गटनेता निवडीचे अधिकार संबंधित पक्षाला असतानाही नव्या गटनेत्यांना नियुक्तीचे पत्र दिल्याने पुन्हा राजकीय वाद रंगण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, वैद्य यांच्या ताब्यातील आवक-जावक रजिस्टरही पळविले होते. याबाबत वरिष्ठांना माहिती न देणे, कार्यालयातून गायब होणे, मोबाईल बंद ठेवणे अशा प्रकारे कर्तव्यात कसूर केल्याबद्दल आयुक्तांनी त्यांना कारणे दाखवा नोटिसही बजावली होती.या राजकीय वादामुळे वरिष्ठ अडचणीत आले होते. त्यामुळे वैद्य यांची नगरसचिवपदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी सावेडीचे प्रभाग अधिकारी एस. बी. तडवी यांची नियुक्ती करण्यात आली. वैद्य यांची माळीवाडा विभागाचे प्रभाग अधिकारी म्हणून तात्पुरती बदली करण्यात आली आहे. सावेडीचे प्रभाग अधिकारी म्हणून जितेंद्र सारसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपायुक्त अजय चारठाणकर यांनी बदलीचे आदेश दिले असून त्याला आयुक्तांनी मान्यता दिली आहे. वैद्य यांच्या बदलीमुळे तडवी आणि सारसर यांचीही बदली करावी लागली.