शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्करांकडून पोलिसांना धक्काबुक्की

By admin | Updated: August 31, 2016 00:30 IST

राहुरी : चिंचोली परिसरात प्रवरा नदीच्या पात्रात मंगळवारी पहाटे पोलीस निरिक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने छापा टाकला़ पोलिसांना

राहुरी : चिंचोली परिसरात प्रवरा नदीच्या पात्रात मंगळवारी पहाटे पोलीस निरिक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने छापा टाकला़ पोलिसांना धक्काबुक्की करीत वाळू तस्कर फरार झाले़ पोलिसांनी जेसीबी, स्कार्पिओ, दोन टेम्पो व एक ट्रॅक्टर ताब्यात घेतला़खबऱ्यामार्फत गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरिक्षक महावीर जाधव यांच्या नेतृत्वाखाली आठ पोलीस चिंचोली येथे दाखल झाले़अंधारात वाळू उपसा सुरू असल्याचे आढळून आले़ पोलिसांना दहा-बारा व्यक्ती जेसीबीच्या सहाय्याने वाहनामध्ये वाळू टाकीत असताना दिसले़ पोलीस कर्मचारी राहुल कदम यांनी सोन्या उऱ्हाडे यांच्यावर झेप घेत पकडले़ अंधारात हिसका देऊन सोन्या फरार झाला़ कदम यांनी पाठलाग केला़ मात्र तो हाती लागु शकला नाही़ दहा बारा व्यक्तीही पळून गेल्या़पथकातील पोलीस उपनिरिक्षक महावीर जाधव, ज्ञानेश्वर पथवे, राहुल कदम, काशीनाथ मरकड, भैरव अडांगळे यांनी वाळूची वाहने ताब्यात घेतली़ वाहने ताब्यात घेऊन राहुरी पोलीस स्टेशनमध्ये आणली़(तालुका प्रतिनिधी)