शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ढोल-ताशांचा गजरात पोलिसांनी केला रिक्षाचालकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 16:58 IST

वाहतूक नियमांचे पालन करणा-या रिक्षाचालकांचा आज वाहतूक शाखेच्यावतीने ढोल-ताशा वाजवून आणि हार घालून सत्कार करण्यात आला तर नियमांकडे कानाडोळा करणा-या ६० जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

ठळक मुद्देवाहतूक शाखेचा उपक्रम: नियम तोडणाऱ्या ६० चालकांवर कारवाईचा बडगा

अहमदनगर: वाहतूक नियमांचे पालन करणा-या रिक्षाचालकांचा आज वाहतूक शाखेच्यावतीने ढोल-ताशा वाजवून आणि हार घालून सत्कार करण्यात आला तर नियमांकडे कानाडोळा करणा-या ६० जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.प्रवासी वाहतूक करणा-या रिक्षाचालकांसाठी असलेल्या नियमावलीची शनिवारपासून शहर वाहतूक शाखेचे निरिक्षक अविनाश मोरे यांनी कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. रिक्षाचालकांना खाकी तर मालकांना सफेद (पांढरा) गणवेश परिधान करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी नुकतेच दिले होते. सर्व रिक्षाचालक व मालकांना नोटीस देऊन पंधरा दिवसांची मुदतही देण्यात आली होती. यामध्ये शासनाने दिलेल्या परवाना कराराप्रमाणेच रिक्षाचालकांनी प्रवासी वाहतूक करावी, रिक्षा चालविताना ठरवून दिलेला गणवेशासह बॅच बिल्ला, वाहनाचे कागदपत्र, परवाना सोबत ठेवावा, जादा प्रवासी बसविण्यासाठी रिक्षात स्पिकर, लोखंडी खुर्ची, प्लास्टिक स्टूल ठेवता येणार नाही. तसेच रिक्षाला कंपनीने दिलेले सीट वाढविता येणार नाही. वाहनाची नोंदणी, परवाना व क्रमांक मिळाल्याशिवाय प्रवासी वाहतूक करता येणार नाही. आदी नियमांचे पालन करणा-याचे आदेश देण्यात आलेले आहेत. शनिवारी मोरे व त्यांच्या पथकाने रिक्षांची तपासणी केली तेव्हा ६० चालकांनी नियम तोडल्याचे आढळून अल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली तर नियम पाळणा-यांना वाहतूक शाखेत बोलावून त्यांचा वाद्य वाजवून गौरव करण्यात आला. वाहतूक शाखेच्या या उपक्रमाचे परवानाधारक रिक्षाचालकांनी स्वागत केले आहे.प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि अस्ताव्यस्त वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी सर्व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जे वाहनचालक पालन करतात त्यांना पोलीस मदत करतात. मात्र कायदा तोडणा-यांवर कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. सर्व रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करून प्रवाशांना योग्य सेवा द्यावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.- अविनाश मोरे, शहर वाहतूक निरिक्षक 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस