शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

नगरमधील पंटरवर नजर ठेवून पोलीस पोहोचले बोठेपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:20 IST

बोठे याने यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचे सुपारी देऊन ३० नोव्हेंबर रोजी हत्याकांड घडवून आणले होते. पोलीस ...

बोठे याने यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचे सुपारी देऊन ३० नोव्हेंबर रोजी हत्याकांड घडवून आणले होते. पोलीस तपासात बोठे याचे नाव समोर येताच तो नगरमधून पसार झाला. त्याला अटक करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मागील तीन महिने दहा दिवसांपासून

पोलिसांनी महाराष्ट्रासह पंजाब, छत्तीसगढ, रायपूर, भोपाळ आदी १०० ठिकाणी बोठेचा शोध घेतला. तो मात्र प्रत्येक वेळी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. बोठे फरार झाल्यानंतर तो त्याचा नगरमधील खास पंटर महेश वसंतराव तनपुरे याच्या संपर्कात होता. शेवटी पोलिसांनी याच तनपुरेवर नजर ठेवून बोठे याचा ठावठिकाणा शोधला. यासाठी नगरची सायबर टीम, मोबाइल सेल, मुंबई येथील सायबर पोलीस यांचीही मदत घेण्यात आली. ठावठिकाणा मिळाल्यानंतर नगर पोलिसांचे सहा पथके हैदराबाद येथील बिलालनगरमध्ये दाखल झाले. त्या ठिकाणी पाच दिवसांत शोधमाेहीम राबविली. प्रथम तीन वेळा बोठेने पोलिसांना गुंगारा दिला. शेवटी सूत्रबद्धरीत्या नियोजन करत पोलिसांनी बोठे याच्यासह त्याला मदत करणाऱ्या पाच जणांना जेरबंद केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, निरीक्षक यादव, संभाजी गायकवाड, ज्योती गडकरी, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, मिथुन घुगे, दिवटे, उपनिरीक्षक समाधान सोळंके, हेड कॉन्स्टेबल रवींद्र पांडे, सहायक फौजदार राजेंद्र वाघ, प्रकाश वाघ, पोलीस नाईक रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, राहुल गुंडू, अभिजित अरकल, जयश्री फुंदे, संजय खंडागळे, संतोष लोढे, गणेश धुमाळ, सचिन वीर, सत्यम शिंदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

------------------------

नगरचा ‘बीबी’ हैदराबादमध्ये झाला बी.बी. पाटील

हैदराबाद येथील गुन्हेगारांचे आश्रयस्थान असलेल्या बिलालनगर येथे बोठे

याने तेथील वकील जर्नादन अकुला चंद्राप्पा याच्या मदतीने आश्रय घेतला

होता. उस्मानिया विद्यापीठातून पीएच.डी. मिळविण्याच्या निमित्ताने बोठे

हा चंद्राप्पा याच्या संपर्कात आला होता. त्यामुळे या दोघांची जुनी ओळख

होती. नगरमध्ये ‘बीबी’ नावाने परिचित असलेल्या बोठे याने हैदराबाद येथे

बी.बी. पाटील हे नाव धारण केले होते. याच नावाने त्याने तेथील

हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. ओळख लपविण्यासाठी त्याने दाढीही वाढविली

होती.

--------------------------

बोठेला मदत करणारी ती महिला कोण?

हैदराबाद येथे बोठे याला पी अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी या महिलेने

मदत केल्याचे तपासात समोर आले आहे. अनंतलक्ष्मी मात्र फरार असून

पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आहे. तिने बोठे याला कशा पद्धतीने मदत केली,

याचा पोलीस शोध घेत आहेत.

--------------

तनपुरेशी संपर्क ठरला घातक

फरार झाल्यानंतर बोठे हा त्याचा नगर येथील खास पंटर महेश तनपुरे याच्या

संपर्कात होता. तनपुरे हा बोठे याला नगरमधून सर्व मदत पुरवीत होता. दोन

दिवसांपूर्वी बोठे आणि तनपुरे यांचा संपर्क झाला हाेता. बोठे याच्याकडील

पैसे संपल्याने तनपुरे त्याला पैसे पाठविणार होता. दरम्यान पेालिसांची

नजर तनपुरेवर होती. तनपुरेच्या संपर्कातूनच पोलीस बोठेपर्यंत पोहोचले.

--------------------

बोठे याने वापरला कुख्यात गुन्हेगाराचा मोबाइल

फरार झाल्यानंतर बोठे याने संपर्कासाठी जो मोबाइल वापरला होता तो मोबाइल

२०१८ मध्ये एका कुख्यात गुन्हेगाराने वापरल्याचे समोर आले आहे. त्या

अनुषंगानेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

--------------------

बोठेला मदत करणारे इतरही रडारवर

फरार होताना व फरार झाल्यानंतर बोठे याला कुणी व कशी मदत केली, याचाही शोध

पोलिसांनी सुरू केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या गुन्ह्यात आरोपी

वाढण्याची शक्यता आहे.

------------

बोठे हा आमच्या कुटुंबाच्या संपर्कात होता. मात्र, त्यानेच घात करत माझ्या

आईची हत्या केली. पोलिसांनी त्याला अटक करावी यासाठी मी व माझे वकील ॲड.

एस.एस. पटेकर सतत पाठपुरावा करत होतो. अखेर पोलिसांनी त्याला अटक

केल्याचे समाधान आहे. या आरोपीला कठोर शिक्षा मिळावी, हीच आता आमच्या

कुटुंबीयांची अपेक्षा आहे.

- रुणाल जरे

फोटो १३ एसपी. १३ बोठे