पोखरी येथील पवळदरा भागातील नदीपात्रातून वाळू उपसा होत असल्याची माहिती पारनेर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक मंगळवारी रात्री नदीपात्राकडे गेल्यावर एका जेसीबीने वाळू उपसा करून तो डंपर व ट्रॅक्टरमध्ये भरत होता. पोलिसांची चाहूल लागताच जेसीबी आणि डंपर वाळू तस्करांनी पळवून नेले, तर ट्रॅक्टर जागीच सोडून देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी ट्रॅक्टरचा शोध घेऊन ट्रॅक्टर ताब्यात घेतला. याची माहिती महसूल विभागास देऊन या ठिकाणी पंचनामा करण्यात आला.
-----------कारवाई संशयाच्या भोवऱ्यात
प्रमोद वाघ यांच्या पथकाने पोखरी येथे वाळू उपसा विरोधात कारवाई केली. तेथून जेसीबी, डंपर पळून गेला, त्यामुळे ही कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यापूर्वी निघोज येथे सपोनि वाघ यांच्या पथकासमोरून जेसीबी पळवून नेण्यात आला होता.
------------