संगमनेर : संगमनेर वकील संघाचे सदस्य अॅड. सचिन काशिनाथ डुबे हे न्यायालयीन कामकाजाकरिता १४ जानेवारी (सोमवारी) घुलेवाडी येथील तालुका पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी पोलीस निरीक्षक एस. आर. पाटील यांनी अॅड. डुबे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत अपमास्पद वागणूक दिल्याचा आरोप डुुबे यांनी केला आहे.या प्रकाराचा संगमनेर वकील संघाच्या वतीने आज एक दिवस काम बंद ठेवून निषेध करण्यात आला. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांना वकील संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.झालेल्या प्र्रकाराबाबत दोन्ही बाजू पडताळल्या जातील. त्यानंतर पोलीस अधीक्षकांकडे अहवाल सादर केला जाईल.- अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी
पोलीस निरीक्षकांची वकीलाला शिवीगाळ : संगमनेरात वकील संघाचे काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 15:53 IST