शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडून आरोपीसह घटनास्थळाची पाहणी

By admin | Updated: July 27, 2016 00:35 IST

अहमदनगर/कुळधरण : कर्जत तालुक्यातील कोपर्डी हत्याकांड प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सोमवारी सायंकाळी घटनेतील मुख्य आरोपी

अहमदनगर/कुळधरण : कर्जत तालुक्यातील कोपर्डी हत्याकांड प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सोमवारी सायंकाळी घटनेतील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याला अतिशय शिताफीने घटनास्थळी नेऊन स्पॉट व्हेरीफिकेशन पूर्ण केले़स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व या प्रकरणातील तपासी अधिकारी शशिराज पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ‘पोलीस’ नामोल्लेख नसलेल्या वाहनातून शिंदे याला सोमवारी सायंकाळी कोपर्डीत नेले़ पथकातील सर्व कर्मचारी साध्या वेशात तर आरोपीचा पेहरावही बदलविण्यात आला होता़ त्यामुळे पोलिसांसह आरोपीसही कुणी ओळखले नाही़ घटना घडल्यानंतर कोपर्डीत पीडित कुटुंबाची भेट घेण्यास दररोज मोठी गर्दी होत आहे़ सोमवारीही घटनास्थळी मोठी गर्दी होती़ त्यामुळे पोलिसांसमोर आरोपीला घटनास्थळी घेऊन जाणे मोठे आव्हान होते़ त्या ठिकाणी आरोपीला कुणीही ओळखले असते तर उपस्थितांचा संताप अनावर झाला असता़ त्यामुळे पथकाने पूर्णत: गुप्तता बाळगून हे काम पूर्ण केले़ आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल करताना सबळ व सक्षम पुराव्याची गरज असल्याने स्पॉट व्हेरिफिकेशन पोलिसांच्या दृष्टिने महत्त्वाचा विषय होता़ (प्रतिनिधी)