शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बु-हाणनगर परिसरात सराईत गुन्हेगारांची टोळी पकडली; दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 22:02 IST

दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांची पाच जणांनी टोळी शुक्रवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. बु-हाणनगर परिसरातील व्हिडिओकॉन कंपनीच्या गेटजवळ ही कारवाई करण्यात आली. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन दोन आरोपी पसार झाले.

अहमदनगर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांची पाच जणांनी टोळी शुक्रवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. बु-हाणनगर परिसरातील व्हिडिओकॉन कंपनीच्या गेटजवळ ही कारवाई करण्यात आली. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन दोन आरोपी पसार झाले.ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून तीन मोटारसायकल, एक गावठी बनावीटीची एअर गन, दोन लोखंडी कटावणी, दोन लाकडी दांडे, ४ मोबाईल असा एकूण १ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दत्तात्रय पद्माकर माळी (वय २८ रा. गळनिंब ता. श्रीरामपूर), श्याम रामदास जाधव (वय २६ रा. संकापूर ता. राहुरी), सचिन हेमंत जाधव (वय २० रा. पिंपळगाव फुणगी ता. राहुरी), धनराज सुरेश केदारी (वय २० रा. राहुरी खुर्द ता. राहुरी) भरत मार्कस जाधव (वय २२ रा. पिंपळगाव फुणगी) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. कारवाईदरम्यान विशाल विजय बनसोडे (रा. पिंपळगाव फुणगी) व महेश तुळशीराम मोरे (रा. गळनिंब) हे दोघे फरार झाले. दरोड्याच्या तयारीत असताना पथकाने पाच जणांना ताब्यात घेतले़ विशाल बनसोडे, भरत जाधव, सचिन जाधव व श्याम जाधव यांच्यावर श्रीरामपूर, संगमनेर व लोणी पोलीस ठाण्यांत चोरीचे गुन्हे दाखल आहेत. हे चोरटे शेतक-यांचे वीजपंप चोरून नेत होते. त्यांनी १३ गुन्ह्यांची कबुली दिली असून, चौकशीत या पाच जणांकडून आणखी गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आरोपींवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची कोठडी दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीधर गुठ्ठे हे करत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह उपनिरीक्षक गुठ्ठे, कॉन्स्टेबल मन्सूर सय्यद, सोन्याबापू नानेकर, दत्तात्रय हिंगडे, फकीर शेख, मनोहर गोसावी, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, दत्तात्रय गव्हाणे, रवींद्र कर्डिले, विशाल दळवी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस