शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपुरातील आरोपीकडून सात मोटारसायकल हस्तगत पोलिसांची कारवाई, आरोपीला अटक

By शिवाजी पवार | Updated: September 15, 2023 13:08 IST

औरंगाबाद, शिर्डीतील वाहने

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : तालुक्यातील माळवाडगाव येथील आरोपीकडून शहर पोलिसांनी चोरीस गेलेल्या सात मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. यात औरंगाबाद जिल्ह्यातील मोटारसायकलचा देखील समावेश आहे. आरोपीचे नाव गणेश संजय खुरासणे (वय २३) असे आहे. त्याच्याकडून ५ लाख ९० हजार रुपये किमतीच्या मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतल्या. खुरासणे याला अटक करण्यात आली आहे.

खंडाळा परसोड (वैजापूर, जि. औरंगाबाद) येथील सोपान जयराम सोनवणे हे त्यांच्या मोटारसायकलवर (एम.एच.४१, ए.पी. ०७६६) ७ जून २०१३ या दिवशी अशोकनगगर फाटा येथे मंगल कार्यालयात विवाह समारंभासाठी आले होते. यावेळी त्यांची मोटारसायकल चोरीस गेली. लोकांकडे चौकशी करूनही गाडी मिळून आली नाही.

अखेर शहर पोलिस ठाण्यात सोनवणे यांनी गुन्हा दाखल केला.   पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी हे गुन्ह्याच्या तपासात होते. त्यांना आरोपी खुरासणे यांच्याविषयी माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकास गाडीचा शोध घेण्याचे आदेश गवळी यांनी दिले.  तपास पथक माळवाडगाव येथे घटनास्थळी जाऊन केलेली पाहणी व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हा आरोपी खुरासणे यानेच केल्याचे निष्पन्न झाले.आरोपीचा गुरुवारी तालुक्यातील वडाळा महादेव परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याने कबुली दिल्याने त्यास तात्काळ अटक करण्यात आली. त्याच्याकडे सखोल तपास केला असता चोरी केलेल्या सात मोटारसायकलची माहिती पोलिसांना दिली. यात औरंगाबाद, शिर्डी, कोपरगाव येथील वाहनांचा समावेश आहे.

टॅग्स :RobberyचोरीAhmednagarअहमदनगर