शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

इमारतींच्या नोंदी ठरणार कळीचा मुद्दा :श्रीराम मंदिर भूखंड घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 16:08 IST

शेवगाव येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या चौकशीच्या दर्जाबाबतच शंका निर्माण झाल्याने सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय वादात सापडण्याची शक्यता आहे.

अहमदनगर : शेवगाव येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या चौकशीच्या दर्जाबाबतच शंका निर्माण झाल्याने सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय वादात सापडण्याची शक्यता आहे. धर्मादायचे अधिकारी जाणीवपूर्वक विश्वस्तांना पाठिशी घालत असल्याचा आरोपही याप्रकरणी सुरु झाला आहे.श्रीराम मंदिर ट्रस्टने ३१ एकर इनाम जमिनीपैकी काही भूखंड भाडेकराराने दिलेले आहेत. ही शेतजमीन असताना तिचा बिगरशेती व्यावसायिक कारणांसाठी वापर करण्यात आला. या भूखंडावर व्यापारी फर्म तसेच परमीट रुम उभे राहिले आहेत. विश्वस्तांनी यातील ५१ भाडेकरार हे तीन वर्षाच्या मुदतीचे केले आहेत. या भाडेकरारांची यादी चौकशी निरीक्षक ज्ञा. शि. आंधळे यांनी आपल्या चौकशी अहवालात जोडलेली आहे. सहायक धर्मादाय आयुक्त व्ही. बी. घाडगे यांच्या चौकशी अहवालातही ही यादी आहे. या यादीत प्रत्येक भाडेकरुला देण्यात आलेल्या भूखंडाचे क्षेत्रफळ व त्यासोबत असणाऱ्या बांधकामाचे क्षेत्र याचा उल्लेख आहे.भूखंड तीन वर्षासाठी भाडेकराराने देताना विश्वस्तांकडे हे बांधकाम आले कोठून? हा मूलभूत प्रश्न निर्माण होतो. त्याचे उत्तरही या अहवालातच आहे. आम्ही भाडेकरुंना भूखंड दिले. त्यावर त्यांनी स्वत:च्या खर्चाने व्यवसायासाठी बांधकाम केले. तीन वर्षाचा भाडेकरार संपल्यानंतर आम्ही ते भूखंड बांधकामासह ताब्यात घेतले व पुढील भाडेकरुला दिले, अशी बाब विश्वस्तांनीच आपल्या जबाबात नमूद केली आहे.भाडेकरुंना बांधकाम करण्याची मुभा विश्वस्तांनी कोणत्या अधिकारात दिली व हे बांधकाम अधिकृत आहे का? असे प्रश्न विश्वस्तांच्या या जबाबातूनच निर्माण होतात. मात्र, चौकशी निरीक्षक आंधळे यांनी याबाबत काहीही आक्षेप उपस्थित केले नाहीत. घाडगे यांनीही याकडे पूर्णत: दुर्लक्ष करुन देवस्थानबाबतची तक्रारच दप्तरी दाखल करण्याचा आदेश केला. त्यामुळे या दोन्ही अधिकाºयांनी केलेल्या कार्यवाहीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धर्मादाय आयुक्तांनी फेरचौकशीचा आदेश दिला. मात्र, पूर्वीची चौकशी योग्य पद्धतीने का झाली नाही? हा प्रश्न आता समोर आला आहे.विश्वस्तांनी बांधकामाबाबत बदल अर्ज सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात दाखल करणे आवश्यक वाटते, असे मत आंधळे यांनी चौकशी अहवालात नोंदविले आहे. याचा अर्थ या कार्यालयाला ट्रस्टने बांधकामांबाबत आजवर काहीही कळविलेले नाही. तरीही ट्रस्टचे कामकाज नियमानुसार सुरु आहे, असे सांगून चौकशी गुंडाळण्यात आली.

द्विसदस्यीय समिती नेमणे शक्यश्रीराम मंदिराबाबत चौकशी निरीक्षक ज्ञा. शि. आंधळे यांनी केलेल्या चौकशीबाबत आक्षेप असतानाही पुन्हा त्यांच्याकडे चौकशी सोपविण्यात आली याकडे धर्मादाय उपआयुक्त हि.का. शेळके यांचे लक्ष वेधले असता, याबाबत द्विसदस्यीय समिती नियुक्त करता येऊ शकेल, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आंधळे हे नगर जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी असल्याने त्यातून चौकशी प्रभावित होऊ शकते, असाही प्रश्न आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर