शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पारनेरच्या शास्त्रज्ञाने बनवले रक्ताच्या गाठी रोखण्याचे औषध

By admin | Updated: April 9, 2017 17:30 IST

हृदयातील रकतवाहिन्याच ब्लॉक होऊ नये, यासाठी पारनेर तालुक्यातील किन्ही येथील शास्त्रज्ञ विनायक खोडदे यांनी औषध शोधले आहे.

आॅनलाईन लोकमतविनोद गोळे / पारनेर (अहमदनगर), दि़ ९- सध्या सर्वसामान्यांना हृदयविकाराचा त्रास वाढला असून, हृदयातील रक्तवाहिन्या ब्लॉकहोत असल्याने आजारपण बळावते. यामुळे बायपास किंवा अ‍ॅन्जिओग्राफीही करावी लागते़ मात्र, हृदयातील रकतवाहिन्याच ब्लॉक होऊ नये, यासाठी पारनेर तालुक्यातील किन्ही येथील शास्त्रज्ञ विनायक खोडदे यांनी औषध शोधले आहे. अमेरिकेतील जागतिक स्तरावरील हाफकिन संशोधन संस्थेत आता त्यावर संशोधन सुरू असून, दोन वर्षांत त्याचा लाभ सामान्यांना मिळू शकतो़ साध्या गवंड्याच्या मुलाने ही अत्युच्य कामगिरी केली आहे़पारनेर तालुक्यातील किन्ही या गावचे विनायक खोडदे यांचे वडील शहाजी गावात गवंडी काम, तर आई ताराबाई शेती करतात़ शहाजी यांनी गवंडी काम करून मुलगा विनायकचे शिक्षण पूर्ण केले़ विनायक यांनी किन्ही येथील प्राथमिक व ओंकारबाबा माध्यमिक विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले़ न्यू इंग्लिश स्कूल पारनेरमध्ये बारावीपर्यंत व पारनेर महाविद्यालयात रसायनशास्त्रात बीएसस्सीपर्यंत शिक्षण घेऊन पुणे येथे रसायनशास्त्रातच एम़एस्सी़ केली़ विनायक यांचे संशोधन क्षेत्रात नावलौकिक मिळवणार असल्याचे लक्षात येताच पुणे येथील भारतीय औषध संशोधन केंद्रात आयसर येथे शास्त्रज्ञ म्हणून नेमणूकही झाली़सन २०११ पासून तेथे काम करताना महिलांना गर्भपिशव्यांना होणारा कॅन्सरवरील औषध शोधण्याचे त्यांनी संशोधन सुरू केले़ सुमारे पाच वर्षांनतर त्यात त्यांना यश येऊन त्याची दखल केंद्र सरकारने घेतली़ त्यांच्या कार्याला त्यांची पत्नी उज्ज्वला यांनी साथ देताना संशोधनात मदत करीत आहेत़ सहा महिन्यांपूर्वी त्यांना जगभरातील शास्त्रज्ञांचे संशोधन केंद्र असणारे अमेरिकेतील जॉन हाफकिन औषध संशोधन संस्थेत भारताचे शास्त्रज्ञ म्हणून निवड करण्यात आली़ विशेष म्हणजे देशभरातून फक्त ते एकमेव शास्त्रज्ञ म्हणून त्यांची यंदा निवड झाली आहे़हृदयविकार दूर होण्यासाठीच संशोधनशास्त्रज्ञ विनायक खोडदे यांनी ग्रामीण भागासह देशभरात,जगभरात हृदयविकाराचा त्रास वाढला असल्याचे त्यांना अनेक पाहणी अहवालानंतर लक्षात आले़ विनायक यांनी हृदयविकार होतोच कसा, याची माहिती घेतल्यावर हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज तयार होत असल्याने रक्ताचा पुरवठा थांबतो व त्यातून माणसाला श्वास घेण्यात अडचणी निर्माण होतात, असे लक्षात आले़ म्हणून विनायक यांनी हृदयातील रक्तवाहिन्या गोठूच नये, तेथील रक्तपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी औषध तयार केले आहे़ आता सध्या ते जागतिक औषध संशोधन केंद्र जान हाफकिन संस्था, अमेरिका येथे त्या औषधाचा किती परिणाम कसा होतो, त्याचा उपयोग कशा पद्धतीने होईल, यावर संशोधन करीत आहेत़ दोन वर्षांत यावर संशोधन पूर्ण होणार आहे़ या संशोधनाचा सामान्य लोकांना मोठा फायदा होणार आहे़