शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईने समजून घेतल्या पीडितांच्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:17 IST

यावेळी भरोसा सेलच्या प्रमुख तथा पोलीस निरीक्षक पल्लवी उबरहंडे यांनी पोलीस मित्र संघटनेच्या अध्यक्षा शारदा हाेशिंगे व त्यांच्या सहकाऱ्यांना ...

यावेळी भरोसा सेलच्या प्रमुख तथा पोलीस निरीक्षक पल्लवी उबरहंडे यांनी पोलीस मित्र संघटनेच्या अध्यक्षा शारदा हाेशिंगे व त्यांच्या सहकाऱ्यांना सेलमधील कामकाजाची माहिती दिली. त्यानंतर हाेशिंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेगवेगळ्या कक्षात थांबून तक्रारी घेऊन आलेल्या महिलांच्या अर्जांवर कामकाज केले. यावेळी पीडित महिलांसह त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी समजून घेत आपसात वाद मिटवावेत, याबाबत प्रबोधन केले. यावेळी बोलताना पल्लवी उबरहंडे म्हणाल्या, समाजात महिलांसह वृद्ध व्यक्तींवर अन्याय, अत्याचाराच्या घटना घडत असतात. आपण समाजात वावरत असतांना अशा अनेक बाबी आपल्या निदर्शनास येतात. अशावेळी एक सजग नागरिक म्हणून पीडितेला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. अन्याय, अत्याचाराच्या बळी ठरत असलेल्या महिलांना एकाच ठिकाणी सर्व कायदेशीर मदत मिळावी, या उद्देशाने भरोसा सेलची स्थापना झालेली आहे. भरोसा सेलच्या माध्यमातून गेल्या तीन ते चार वर्षात अनेकांचे संसार पुन्हा जोडले आहेत. एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून आपणही पीडितांची मदत करावी तसेच महिलांनी अन्याय सहन न करता भरोसा सेलकडे तक्रार करावी अथवा १०९१ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश इंगवले, राजू वाघ, सादीक शेख, सुमन दिघोळे, पोलीस नाईक स्वाती कुचे, सुलभा अवटी, अनिता विधाते, योगिता साळवे, स्वाती ढवळे, साेनिया पारधे, सोनाली रोहकले, सुनीता पवार आदी उपस्थित होते.

फोटो ०८ भरोसा सेल

ओळी - पोलीस रेझिंग डे निमित्त भरोसा सेल पोलीस मित्र संघटनेच्या सदस्यांनी एक दिवसाचे कामकाज पाहिले. यावेळी सेलच्या प्रमुख पल्लवी उबरहंडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.