शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी गावांना पाणी देण्याची भूमिका बजवा : सदाशिव लोखंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 12:37 IST

२००५ साली समन्यायी पाणी वाटपाचा कायदा झाला नसता तर ११ टीएमसी पाणी खाली गेले नसते. पाण्याचे, दुधाचे महत्त्व असलेल्यांनी हा कायदा करण्याचा निर्णय घेतला.

संगमनेर : २००५ साली समन्यायी पाणी वाटपाचा कायदा झाला नसता तर ११ टीएमसी पाणी खाली गेले नसते. पाण्याचे, दुधाचे महत्त्व असलेल्यांनी हा कायदा करण्याचा निर्णय घेतला. गावांमध्ये कुणीही टॅँकरचे राजकारण करू नये. दुष्काळी गावांना पाणी देण्याची महत्वाची भूमिका तलाठी, ग्रामसेवक यांची आहे. त्यांनी नियुक्ती केलेल्या ठिकाणी त्यांनी राहणे गरजेचे आहे, असे खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले.संगमनेरातील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवानातील सभागृहात बुधवारी आयोजित पाणी टंचाई आढावा बैठकीत लोखंडे बोलत होते. व्यासपीठावर प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी श्रीनिवास पगडाल, महावितरणचे कार्यकारी अभियंता रमेश घुगे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, शहरप्रमुख अमर कतारी, भाजपाचे शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख बाबासाहेब कुटे, शरद थोरात, गुलाब भोसले, जयवंत पवार, आप्पा केसेकर, संजय फड, अरुण इथापे, साहेबराव वलवे, बुवाजी खेमनर, अमित चव्हाण, पप्पू कानकाटे, लखन घोरपडे यांसह नागरिक उपस्थित होते. शिवसेनेचे तालुकाप्रमुख आहेर म्हणाले, पिण्याच्या पाण्याचा टॅँकर सुरू करावा, यासाठी काकडवाडी ग्रामस्थांनी प्रस्ताव दिला होता. मात्र, भीषण पाणी टंचाई असूनही तो सुरू झाला नाही. पारेगाव येथे तलाठी नसल्याने ग्रामस्थांची कामे रखडली आहेत. तेथे तलाठ्याची नेमणूक करावी. अशी मागणी त्यांनी केली.‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनची दखल‘टॅँकर गेले कुण्या गावा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने एकाच दिवशी जिल्ह्यातील ५० गावांमध्ये स्टिंग आॅपरेशन केले होते. याबाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख आहेर यांनी या आढावा बैठकीत ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंगमुळेच प्रशासन जागे झाले असल्याचे सांगितले. या वृत्ताची प्रशासनाला दखल घ्यावी लागली असल्याचे आहेर म्हणाले. तसेच इतरांनी देखील या स्टिंग आॅपरेशनचे कौतुक केले.अवैध वाळू उत्खनन, कत्तलखाने बंद कराबैठकीत पाणी टंचाईबरोबरच अवैध वाळू उत्खनन व शहरातील अवैध कत्तलखाना आदी प्रश्न उपस्थितांनी मांडले. अवैध वाळू उत्खननामुळे नदीपात्रातील विहिरींची पातळी खालावली आहे. त्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाल्याचे उपस्थित असलेल्या अनेकांनी बोलून दाखविले. तर शहरातील अवैध कत्तलखान्यांमध्ये गोवंश जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. येथील रक्तमिश्रीत पाणी नदीपात्रात सोडले गेल्याने सुकेवाडी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या नदीपात्रातील विहिरीत ते उतरल्याचे सुकेवाडी ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे अवैध वाळू उत्खनन व कत्तलखाने बंद व्हावेत, अशी अपेक्षा अनेकांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर