शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना अमरापूरकर गौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 14:10 IST

अहमदनगर : थिंक ग्लोबल फौंडेशनचा या वर्षीचा स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला ...

अहमदनगर : थिंक ग्लोबल फौंडेशनचा या वर्षीचा स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे. फौंडेशनचे अध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा केली.जेष्ठ दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे ३ नोव्हेंबर २०१४ रोजी अकाली निधन झाले होते. त्यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शुक्रवारी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. अमरापूरकर हे नगरचे भूषण होते. त्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर हिंदी व मराठी नाट्य, चित्रपट क्षेत्रात आपले अढळ स्थान निर्माण केले. त्यांचे नाव व कार्य कायम स्मरणात राहावे व त्यांच्या नावे दिल्या जाणा-या पुरस्काराच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्ती व संस्था यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना सन्मानित करावे, या हेतूने मागील वर्षापासून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. ए. आर. रेहमान, आर. डी. बर्मन, शिव-हरी, बप्पी लहरी, अन्नू मलिक, विशाल भारद्वाज या हिंदीतील मोठ्या संगीतकारांबरोबर काम केलेल्या वाडकरांनी मराठीतील पं. हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे, सुधीर फडके, वसंत देसाई, अशोक पत्की, अनिल-अरुण यांच्या बरोबर देखील खूप काम केले आहे. लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या बरोबर गायलेली त्यांची अनेक युगुल गीते लोकप्रिय आहेत. लवकरच नगर शहरात भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करून मान्यवरांच्या उपस्थितीत सुरेश वाडकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष किरण काळे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस शिल्पकार प्रमोद कांबळे, सीए राजेंद्र काळे, गायक पवन नाईक, मनपाचे माजी शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी, चित्रपट निर्माते श्रीपाद दगडे, फौंडेशनचे पदाधिकारी स्वप्निल पाठक आदी यावेळी उपस्थित होते.

पद्मविभूषण देण्याची करणार मागणी

वाडकरांचे सांगितिक योगदान दैदिप्यमान असूनही त्यांना पद्मविभूषण, पद्मश्री या पुरस्कारांनी भारत सरकारने आजवर सन्मानित केले नाही, याची खंत वाटत असल्याचे यावेळी काळे म्हणाले. पद्म पुरस्कारासाठी महाराष्ट्र शासनाने वाडकरांच्या नावाची शिफारस भारत सरकारकडे करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याकडे लवकरच करणार असल्याचे यावेळी काळे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSuresh Wadkarसुरेश वाडकर