शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनवाणी पायांनीच ‘खेलो इंडिया’

By साहेबराव नरसाळे | Updated: September 15, 2018 11:15 IST

ना पायात शूज, ना धावण्यासाठी चांगला ट्रॅक, तहानलेले खेळाडू अन् कोरड्या भाकरींवरच पोटाची आग शमवून ‘अडथळ्यांची शर्यत’ रंगलेली असे चित्र शुक्रवारी नगरमधील वाडिया पार्क मैदानावर पहायला मिळाले.

साहेबराव नरसाळेअहमदनगर : ना पायात शूज,  ना धावण्यासाठी चांगला ट्रॅक, तहानलेले खेळाडू अन् कोरड्या भाकरींवरच पोटाची आग शमवून ‘अडथळ्यांची शर्यत’ रंगलेली असे चित्र शुक्रवारी नगरमधील वाडिया पार्क मैदानावर पहायला मिळाले.जिल्हा क्रीडा कार्यालय व महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा शुक्रवारी वाडिया पार्क क्रीडा संकुलात झाल्या. धावणे, उंच उडी, लांब उडी, तिहेरी उडी, थाळी फेक, गोळा फेक, भाला फेक, अडथळ्यांची शर्यत अशा स्पर्धांमुळे वाडिया पार्क खेळाडूंनी गजबले होते. जिल्हाभरातून सुमारे ६५० खेळाडू वाडिया पार्कमध्ये दाखल झाले होते. मात्र, शेकडो किलोमीटरचा प्रवास करुन वाडिया पार्क क्रीडा संकुलात दाखल झालेल्या खेळाडूंसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती.  खेळाडूंच्या जेवणाचीही व्यवस्था प्रशासनाला करता आली नाही. जेथे जागा मिळेल तेथेच बसून मुले आईने दिलेला डबा उघडून खात होते. कोरड्या भाजीबरोबर भाकरी तर काहींच्या डब्यामध्ये भाजीही नव्हती. आपल्या संघासाठी, शाळेसाठी, जिल्ह्यासाठी आणि राज्यासाठी खेळण्याचे स्वप्न पाहणारी ही मुले कोरड्या भाकरी पोटात ढकलून मैदानात जीव तोडून खेळत होती.प्रारंभी मैदानात पाण्याची व्यवस्था केली. मात्र, ते पाणी संपल्यानंतर पुन्हा पाणी आणण्याची तसदीही कोणी घेतली नाही. जेवायचे म्हटले तरी मुलांना बाहेर जाऊन पाण्याची बाटली आणावी लागत होती. काही मुले घरातून भल्या सकाळीच बाहेर पडली होती. त्यांना डबाही देण्यात आला नव्हता. अशा मुलांनी वाडिया पार्कमध्ये भेळीवरच भूक भागवून मैदान मारले. कोणत्याही स्पर्धेत उतरण्यापूर्वी खेळाडूकडे खेळाच्या पूर्ण सुविधा असल्या पाहिजेत. पण येथे अनेक खेळाडूंच्या पायात साधे बूटही नव्हते. धावताना, उंच उडी मारताना पाया-पोटात गोळा आला तरी त्यावर उपचाराची व्यवस्था नव्हती. अनवाणी धावणाऱ्या एका मुलाला काटा मोडला तर त्याला ट्रॅक सोडावा लागला. कर्जतचा एक मुलगा पायात क्रॅम्प आला म्हणून विव्हळत होता. पण खेळाडूंची साधी कोणाला दखल घ्यावीशी वाटली नाही.स्पर्धेच्या नियोजनासाठी १५ हजार निधीजिल्हास्तरीय स्पर्धेत खेळाडूंच्या जेवणाची व्यवस्था करण्याची तरतूद नाही. अनेक मुले लांबून येतात. त्यांचा सर्व खर्च हौशी पालक करतात. अनेक शाळांकडेही खेळासाठी निधी नसतो. त्यामुळे मुलांकडूनच पैसे गोळा करुन त्यांना आणले जाते. पूर्वी स्पर्धेच्या आयोजनासाठी अडीच हजार रुपये मिळत होते. आता १५ हजार रुपये मिळत आहेत. त्यातून पंचांच्या चहा, नाष्टा आणि जेवणाची व्यवस्था केली जाते, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी यांनी ‘लोकमत’ला दिली. तालुकास्तरीय स्पर्धेच्या आयोजनासाठी १० हजार रुपये शासनाकडून मिळतात.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय