या शिबिरात एकूण १२२ रक्तपिशव्या संकलित केल्याची माहिती प्रतिष्ठानचे पवन काळे यांनी दिली. त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत, एक समाजोपयोगी उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन केले. अमृता ब्लड बँक औरंगाबाद यांच्या सहयोगाने हे शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी योगेश पवार, विष्णू खोसे, बलभीम कर्डिले, प्रशांत धालपे, सागर सोबले, अक्षय काळे, गणेश जाधव, प्रदीप ठाणगे, युवराज जाधव, अल्ताब मुल्ला, प्रशांत शिंदे, मयूर सोनटक्के, राजन कुलकर्णी, शिवमूर्ती कलशेट्टी, शशांक काळे, वैभव आंबेकर, अभिजीत दीक्षित, चिदानंद संगापूरकर आदी उपस्थित होते.