तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला येथे आधार फाउंडेशनच्या माध्यमातून ६० केशर आंब्याच्या रोपांची व इतर वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. या वृक्षारोपण मोहिमेत श्री संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
आधार फाउंडेशनच्या माध्यमातून बालगृह संगमनेर, बिरेवाडी, नान्नज दुमाला, काकडवाडी, पारेगाव खुर्द, आदी ठिकाणी विविध वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपण मोहीम प्रसंगी मुख्याध्यापिका मंगल देशमुख, शिक्षक सुभाष वारुंक्षे, शशांक खोजे, अलका दरंदले, मनीषा शेळके, पंडित काळे, बाळासाहेब कुळधरण, वसंत बोडखे, वसंत डांगळे, संजय शिंदे, सुनील वाकचौरे, सखाराम पटांगरे, बाबासाहेब गर्दे, संकेत फड, राजेंद्र गायकवाड, मच्छिंद्र मंडलिक उपस्थित होते. अनुष्का परदेशी, अदिती गांडोळे, सार्थक गांडोळे, आश्लेषा चत्तर, स्नेहल फड, सिद्धी फुलसुंदर, शालिनी फड, प्रांजल परदेशी, आशा फड, गायत्री भालेराव, आदींनी वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेतला. उपक्रमासाठी आधार फाउंडेशनचे समन्वयक डॉ. महादेव अरगडे, विठ्ठल कडूसकर, अनिल कडलग, सुखदेव ईल्हे, पी. डी. सोनवणे, सोमनाथ मदने, लक्ष्मण कोते, आदींनी सहकार्य केले. आधाराचे समन्वयक बाळासाहेब पिंगळे यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले.