शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

‘निळवंडे’तून पिण्यासाठी आवर्तन

By admin | Updated: April 27, 2016 23:52 IST

अकोले / राजूर : निळवंडे धरणातून बुधवारी दुपारी १२ वाजता पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले. १ हजार ६०० क्युसेक वेगाने पाणी नदी पात्रातून लाभक्षेत्राकडे झेपावले आहे.

अकोले / राजूर : निळवंडे धरणातून बुधवारी दुपारी १२ वाजता पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले. १ हजार ६०० क्युसेक वेगाने पाणी नदी पात्रातून लाभक्षेत्राकडे झेपावले आहे. संगमनेर तालुक्यातील ओझर पिक वॉलपर्यंत पाणी पोहचताच आवर्तन थांबवण्यात येणार आहे.अकोले व संगमनेर तालुक्यासाठी हे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन असून तीन दिवस आवर्तन सुरू राहणार आहे. दोन्ही तालुक्यातील नदी काठावरील गावांच्या मंजूर पाणी पुरवठा योजना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आकस्मित पाणी पुरवठा योजनांना आवर्तनाचा फायदा होणार आहे. आवर्तन काळात ३०० ते ३२५ दलघफू इतके पाणी वापरात येणार आहे. निळवंडे ते संगमनेर नदीकाठ भागात वीज पुरवठा १९ तास खंडित केला जणार आहे. तर पाच तास वीज सुरू राहणार आहे. प्रवरा नदी पात्रात कोरडे खाणडोह असल्याने पाणी संथ गतीने वाहण्याची शक्यता आहे. पाणी सोडतेवेळी निळवंडे धरणात ७११ दशलक्ष घनफूट तर भंडारदरा धरणात १ हजार ५६५ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा होता़ भंडारदरा धरणातून अद्याप पाणी सोडलेले नाही, असे सहायक अभियंता जी. जी. थोरात यांनी सांगितले़मुळा खोऱ्यातील बलठाण, कोथळे, घोटी, शेळवंडी या लघुपाटबंधारे प्रकल्पांतून आणि पिंपळगाव खांड या धरणातून पिण्यासाठी पहिले व शेवटचे आवर्तन सोडण्यात आले आहे़ पिंपळगाव खांड धरणात केवळ मृत पाणीसाठा शिल्लक आहे़ तर मुळा खोऱ्यातील सर्वच छोट्या धरणांनी तळ गाठला आहे़ त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहे़ गुरुवारी दुपारपर्यंत मुळा खोऱ्यातील या प्रकल्पांमधून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात येणार आहे़