शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडलेला बिबट्या वनखात्याकडून पिंज-यात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 12:39 IST

शिकार करण्यासाठी निघालेला बिबट्या विहिरीत पडला़ वनखात्याने पिंजरा लावून रविवारी (९ मार्च) रात्री ११ वाजता बिबट्याला पिंज-यात जेरबंद करण्यात यश  मिळविले. उसाचे क्षेत्र कमी झाल्याने राहुरी तालुक्यात बिबट्यांची लपवण व पोटासाठी धडपड सुरू आहे. 

राहुरी : शिकार करण्यासाठी निघालेला बिबट्या विहिरीत पडला़ वनखात्याने पिंजरा लावून रविवारी (९ मार्च) रात्री ११ वाजता बिबट्याला पिंज-यात जेरबंद करण्यात यश  मिळविले. उसाचे क्षेत्र कमी झाल्याने राहुरी तालुक्यात बिबट्यांची लपवण व पोटासाठी धडपड सुरू आहे. रविवारी रात्री बिबट्या कात्रड येथील ज्ञानदेव तांबे व रंगनाथ घुगरकर यांच्या शेतातील विहिरीत पडला़ ३० फूट खोलीच्या विहिरीत बिबट्या पडल्यानंतर वनखात्याच्या कर्मचाºयांनी घटनास्थळी जाऊन बिबट्यासाठी विहिरीवर पिंजरा लावला़ विहिरीत पाणी नसल्याने बिबट्याला मुका मार लागला़ बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती उपसरपंच शरद दांगट यांनी वनविभागाला दिली़ वनविभागाचे कर्मचारी गोरक्षनाथा लोंढे, महादू पोकळे, लक्ष्मण किनकर, ताराचंद गायकवाड यांनी विहिरीवर पिंजरा लावला़ विहिरीत पडलेला बिबट्याला मुका मार लागल्याने तो बेशुध्द पडला होता़ ग्रामस्थांनी बिबट्याला शुध्दीवर आणण्यासाठी त्याच्या अंगावर पाणी टाकले़ त्यानंतर बिबट्या शुध्दीवर आला़ बिबट्या जेरबंद करण्यासाठी पोलीस पाटील आदिनाथ घुगरकर, रायभान घुगरकर, रावसाहेब तांबे, रंगनाथ घुगरकर, धनंजय पटारे, शिवाजी तांबे, माधव घुगरकर आदींनी सहकार्य केले़ सर्वत्र शांतता झाल्यानंतर विहिरीत टाकलेल्या शिडीवर चढून बिबट्यावर आला़ विहिरीवर आलेल्या पिंजºयात बिबट्या जेरबंद झाला़ बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी कात्रड येथे गर्दी केली होती़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरleopardबिबट्याforest departmentवनविभाग