शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांद्वारे मिळविली खडी क्रशरची परवानगी

By admin | Updated: May 18, 2017 14:16 IST

बनावट ना हरकत दाखला तयार करुन २०१६ साली खडीक्रशरची परवानगी मिळविल्याची बाब तत्कालिन सरपंच शिवाजी गायकवाड यांच्या प्रतिज्ञापत्रावरुन उघडकीस आली आहे़

आॅनलाईन लोकमतचिचोंडी पाटील, दि़ १८ - नगर तालुक्यातील उक्कडगाव येथील खडीक्रशर चालकाने २०११ सालचा उक्कडगाव ग्रामपंचायतचा बनावट ना हरकत दाखला तयार करुन २०१६ साली खडीक्रशरची परवानगी मिळविल्याची बाब तत्कालिन सरपंच शिवाजी गायकवाड यांच्या प्रतिज्ञापत्रावरुन उघडकीस आली आहे़उक्कडगावचे तत्कालिन सरपंच शिवाजी गायकवाड यांनी खडीक्रशरसाठी २०११ साली ना हरकत दाखला दिलाच नव्हता असे प्रतिज्ञा पत्रात म्हटले आहे़ उक्कडगावात खडीक्रशरवरुन वाद सुरु आहेत़ त्यामुळे गायकवाड यांनी ग्रामपंचायतीला प्रतिज्ञापत्राद्वारे खडीक्रशरला परवानगी नाकारल्याचे सांगितले आहे़ या प्रतिज्ञापत्रात गायकवाड यांनी म्हटले आहे, मी २००७ साली वार्ड क्रमांक एकमधून सदस्य म्हणून निवडणून आलो व २००७ ते २०१२ या कालावधीतसाठी मी सरपंच पदावर काम पाहिले़ या कालावधीत मी खडीक्रशरसाठी ग्रामपंचायतमार्फत कुठलाही ना हरकत दाखला दिला नाही, तसेच खडीक्रशर मालकांनी बनावट ना हरकत दाखला तयार करून त्यावर माझ्या सहीची नक्कल मारली आहे़ या बनावट ना हरकत दाखल्याद्वारे खडीक्रशर चालकांनी २०१६ मध्ये परवानगी मिळवून शासनाची फसवणूक केली आहे़खडीक्रशर चालकांनी ना हरकत दाखले बनावट बनवल्याचे माजी सरपंच शिवाजी गायकवाड यांनी प्रतिज्ञापत्रावर ग्रामपंचायतला लेखी दिले आहे़ यावरून शासनाची फसवणूक करुन खडीक्रशरला परवानगी मिळल्याचे सिद्ध होत आहे़ त्यामुळे हे खडीक्रशर त्वरीत बंद करण्यात यावे़ ग्रामस्थांनाही या खडी क्रशरचा मोठा त्रास होत असून त्यांच्या हातून काही विपरीत घडल्यास यास प्रशासन स्वत: जबाबदार राहील, असे उक्कडगावचे विद्यमान सरपंच नवनाथ म्हस्के यांनी सांगितले़