शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जनताच ‘ईडी’ची बिडी करून फुंकतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:15 IST

अहमदनगर : भाजपला बहुजनांचे राजकारण संपवायचे आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस आली, उद्या मलाही येऊ शकते. ...

अहमदनगर : भाजपला बहुजनांचे राजकारण संपवायचे आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस आली, उद्या मलाही येऊ शकते. मात्र, कोणीही सत्तेचा मुकुट घेऊन आलेला नाही. केंद्रीय संस्थांचा दुरुपयोग करणाऱ्या भाजपविरुद्ध लोक चिडतील आणि ईडीची बिडी करून फुंकतील, अशा शब्दात राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवर यांनी भाजपला इशारा दिला.

ओबीसी समाजाच्या मेळाव्यासाठी वडेट्टीवार शनिवारी नगरमध्ये होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, भाजप हा मुळात भांडवलदारांचा पक्ष आहे. त्यांना फक्त व्यापारी आणि भांडवलदारांचे हित जपायचे आहे. त्यांना अन्य घटकांशी काहीही देणे- घेणे नाही. उलट राजकारणात बहुजनांना मोठे होऊ न देण्याचे त्यांचे धोरण आहे. जर कोणी मोठा होत असेल तर त्याची कोंडी केली जाते. बदला घेण्याची वाईट प्रथा भाजपने राजकारणात आणली आहे. मतभेदाऐवजी मनभेद वाढले आहेत. मात्र, जे पेराल ते उगवणार आहे, हे भाजपने लक्षात घ्यावे. विविध राज्यांतील बहुमताचे सरकार पाडणे ही लोकशाही पायदळी तुडविण्याचा प्रकार आहे.

मराठा आरक्षणसंबंधीच्या मंत्रिगटाच्या उपसमितीचा अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली आहे. याकडे लक्ष वेधले असता वडेट्टीवार म्हणाले, मेटे हे पक्के राजकारणी आहेत. माध्यमांसमोर येऊन प्रसिद्धीत राहायचे, एवढ्यासाठीच ते बोलतात. पाहिजे तो निकाल लावायला चव्हाणांच्या हातात काय कोर्ट आहे का? चव्हाण यांनी मराठा आरक्षणाबाबत जे काम केले ते आतापर्यंत कोणीही केलेले नाही. मेटे यांची भूमिका राजकीय प्रेरित आहे. अन्यथा शिवस्मारकाच्या निविदा प्रक्रियेत काय घोळ केले, हे आम्हाला सांगावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. राज्य सरकारमध्ये तिन्ही पक्षांचा योग्य समन्वय आहे. जोपर्यंत भाजपची जिरवत नाही, तोपर्यंत आम्ही एकत्रच आहोत. मान- समान कार्यक्रमात तिन्ही पक्ष एकत्र आहेत. अजित पवार हे शिवसेनेला सोबत घेण्याबाबत बोलले असले तरी त्याचा अर्थ काँग्रेससह सेनेला सोबत घेऊ असाच आहे, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

-----------

घाण्यापासून तेलाचे क्लस्टर

बाजारात मिळणारे तेल खाऊन हृदयरोग वाढले आहेत. तरुणांचा जीव जातो आहे. त्यामुळे घाण्यापासून तेल तयार करण्याचे क्लस्टर आम्ही विदर्भात करीत आहोत. यामुळे आरोग्यासोबतच पाच हजार तरुणांना रोजगार

देता येणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. वसंतराव नाईक विकास महामंडळासाठी निधी वाढवून दिला आहे. याशिवाय बारा बलुतेदारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यासाठी सरकार काम करीत असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.