शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अकोले तालुक्यात मोरांचे दर्शन झाले दुर्लभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 02:53 IST

प्रशासनाकडे निश्चित आकडेवारी नाही; शिकाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

- मच्छिंद्र देशमुख कोतूळ (जि. अहमदनगर) : अंगणांमध्ये कोंबड्यांबरोबर मोरही खेळताना पाहणारे अकोले तालुक्यातील ग्रामस्थ मोर गेले कुठे, या प्रश्नाने बैचेन झाले आहेत. सध्या मोरांचा प्रजनन काळ सुरू असताना त्याचा केकारव कुठेच ऐकू येत नाही. हमखास होणारे दर्शनही दुर्लभ झाल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात शिकार होत असल्याचा कयास व्यक्त केला जात आहे.अकोले तालुक्यात मोठी वनसंपदा असल्याने विविध प्राणी व पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. १९९९ ते २०१४ या कालखंडात अकोले तालुक्यात मोरांची संख्या झपाट्याने वाढली. तालुक्यात येणाºया प्रत्येक पर्यटकाला हमखास मोराचे दर्शन व्हायचे. प्रत्येक गावच्या शिवारात सकाळी होणारा मोरांचा केकारव गावकऱ्यांच्या अंगवळणी पडला आहे. शाळेत, रानात या आवाजाची हुबेहूब नक्कल करणारे लोकही आहेत. अनेक शेतकºयांना पेरणी, काढणीपर्यंत मोरांचा त्रासही व्हायचा. कोंबड्यांबरोबर मोरही अंगणात खेळायचे. मात्र असे चित्र सध्या कुठेच आढळून येत नाही.तालुक्यात वन्यजीव व वन विभाग असे दोन विभाग प्राणी-पक्षीसंपदेसाठी काम करतात. वन्यजीव विभागात शेती असल्याने मोरांचा वावर कमी आहे. मात्र वन विभागाच्या कोतूळ, राजूर, अकोले, समशेरपूर या चारही परिक्षेत्राच्या कक्षेत बागायती शेती आहे.टॉमॅटो, फळबागा, मका, भुईमूग, तेलबियांची शेती, मोठी झाडे व उन्हाळ्यात सहज पाणी उपलब्ध होते. त्यामुळे गेल्या वीस वर्षांत मोरांची संख्या वाढली. समशेरपूर, विरगाव, गणोरे, तांभोळ, कळस, सुगाव, गर्दनी, इंदोरी, रूंभोडी, वीठा, म्हाळादेवी, चितळवेढे या बारमाही बागायती पट्ट्यात मोठ्या संख्येने मोर होते.पेबई, चिंचवणे, वाशेरे, कळंब, पिसेवाडी, मन्याळे, अंभोळ, अबिटखिंड, सावरचोळ, वाघापूर, लिंगदेव, चिंचखांड शिवनदी या घाट परिसरात मोठ्या संख्येने मोर सकाळी आणि संध्याकाळी दिसायचे. मात्र हे दर्शन सध्या दुर्मीळ झाले आहे.प्रशासनाकडे पक्षी गणना तक्ताच नाहीवन विभागाचे राजूर व अकोले परिक्षेत्राधिकारी तसेच संगमनेर येथील विभागीय वनाधिकारी यांच्याकडे गेल्या तीन वर्षांतील पक्षी गणना तक्ता मागितला. मात्र आमच्याकडे याबाबत कसलाही तक्ता उपलब्ध नसल्याचे अधिकाºयांनी लोकमतला सांगितले.पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेने सध्या तालुक्यात फक्त दहा टक्के मोर आहेत. अवैध शिकार होत असल्याची शंका आहे. वन विभागाने कायदा व संवर्धन याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात.- डॉ. आकाश देशमुख, पशुवैद्यक तथा पक्षी अभ्यासक