शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

कृषी विद्यापीठात ठिबकची माहिती पाझरेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 15:51 IST

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे किती क्षेत्र पाणलोटाखाली, किती ठिबकखाली यांची आकडेवारी राहुरीत उपलब्ध नसल्याची बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली.

भाऊसाहेब येवले राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे किती क्षेत्र पाणलोटाखाली, किती ठिबकखाली यांची आकडेवारी राहुरीत उपलब्ध नसल्याची बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली. सिंचन पध्दतीच्या माहितीसाठी विद्यापीठाने राज्यात तब्बल १४० ठिकाणी अपील करून माहिती घेण्याची अजब सूचना केली आहे.मातृभूमी संस्थेने माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाची जमीन, आकडेवारी व त्यावर वापरण्यात आलेली ठिबक व तुषार क्षेत्राची माहिती विचारली होती. विहीर व बोअरखालील क्षेत्र, पाटपाण्याचे क्षेत्र, पावसावर अवलंबून असलेले क्षेत्र,मुळा धरणातून मिळणारे पाणी यासंदर्भात ही माहिती विचारली होती. विद्यापीठाची आठ हजार हेक्टर जमीन असून मुख्य कार्यालय राहुरीत आहे. असे असताना सहयोगी संशोधन संचालक तथा जनमाहिती अधिकारी विठ्ठल शेंडे यांनी विद्यापीठाचे दहा जिल्ह्यात कार्यक्षेत्र असल्याचे नमूद केले़ ९ कृषी महाविद्यालये, ८ कृषी तंत्र विद्यालय, २७ संशोधन केंद्रातील ४४ संशोधन प्रकल्प,७६ संशोधन योजना यांच्याकडे बोट दाखविले आहे़ १४४ ठिकाणी अर्ज करून माहिती घेण्याची सूचना करण्यात आली आहे़राहुरी तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील विद्यापीठाचे सिंचन क्षेत्र विचारले होते. माहितीच्या अधिकाराचे पंख छाटण्यासाठी विद्यापीठाने चक्क कृषी दर्शन डायरीची झेरॉक्स असलेली पाने पत्ते व फोननंबरसह माहितीच्या अधिकारात पाठविली आहेत.कृषी विद्यापीठाने ठिबक व तुषार सिंचनाचे प्रकल्प राबविले आहेत. मुळा धरणातून विद्यापीठाच्या शेतजमिनी व संशोधनासाठी तब्बल ६०० दलघफू पाणी राखीव म्हणून दिले जाते़ त्यापैकी बरेच पाणी वाया जाते़ शेतकऱ्यांना ठिबक सिंचन वापरण्याचा सल्ला देणाºया विद्यापीठाकडे ठिबकचा वापर होत नसल्याची चर्चा आहे़माहितीच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यासाठी विद्यापीठ उडवाउडवीची लेखी उत्तरे देतात़ माहिती टाळण्याच्या प्रवृत्तीमुळे अधिकारी बदनाम होत आहेत़ अर्ज धुडकावून लावणे हे कायद्यााच्या विरूध्द आहे़ यासंदर्भात कुलगुरूंकडे अपील करण्यात येईल़- कुमार डावखर, अध्यक्ष,राहुरी तालुका भारतीय संसदविद्यापीठाचे कार्यक्षेत्र दहा जिल्ह्यासाठी असल्याने माहिती राहुरीत उपलब्ध नाही़ प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र अधिकारी आहे़ त्यामुळे नाव व पत्त्यासह यादी देण्यात आली आहे़ संबंधित ठिकाणी स्वतंत्र अर्ज करून माहिती उपलब्ध करून द्यावी.- विठ्ठल शेंडे, सहयोगी संशोधन संचालक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी