पगार द्या, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शिक्षक भारतीचे राज्य सचिव तथा शिक्षक नेते सुनील गाडगे यांनी दिला आहे. ते म्हणाले, शिक्षण विभागाच्या बेजबाबदार कारभाराचा फटका जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसत आहे. ऐन सणासुदीत शिक्षकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. कोरोनाच्या कामामध्ये अनेक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून शिक्षक काम करत आहेत. काम करताना अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. आजही काही शिक्षक रुग्णालयात तर काही होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. कर्जाचे हप्ते भरण्यासाठी बँकेकडून तगादा सुरू आहे. मात्र पगार झाला नसल्याने अनेकजण नैराश्यात आहेत. काही दिवसांपासून आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी शिक्षण विभागातील कारभाराबद्दल आवाज उठवला होता. आता शिक्षकांचे पगार तातडीने द्या, अशी मागणी शिक्षक गाडगे यांच्यासह जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, उर्दू विभागाचे जिल्हाध्यक्ष मोहमंद समी शेख, योगेश हराळे, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, जिल्हा माध्यमिकचे सचिव विजय कराळे, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, उच्च माध्यमिकचे जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, संभाजी पवार, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, संतोष देशमुख, किसन सोनवणे, संजय तमनर, संभाजी चौधरी, नवनाथ घोरपडे, कैलास जाधव, गोरखनाथ गव्हाणे, जॉन सोनवणे, रेवण घंगाळे, सोपानराव कळमकर, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, महिला सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुंज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर आदींनी केली आहे.
----------
शिक्षण, वित्त विभागात समन्वयाचा अभाव
शिक्षण विभाग व वित्त विभाग यांच्यात समन्वय नसल्याने पैसे येऊनही वित्त विभागाने पगाराची बिले नाकारली आहेत. या बाबतीत शिक्षण संचालकांनी पत्र लिहिले आहे. मात्र अद्यापही कार्यवाही झालेली नाही, अशी माहिती गाडगे, जगताप यांनी दिली.