शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाचपुते प्रकरणाकडे पवारांचा कानाडोळा

By admin | Updated: August 9, 2014 23:32 IST

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत असलेली घुसमट, यामुळे नाराज झालेले माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे निश्चित केले.

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत असलेली घुसमट, यामुळे नाराज झालेले माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे निश्चित केले. त्यावर जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी त्यांची समजूत काढत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कोर्टात हा विषय काढण्याचे आश्वासन दिले. शनिवारच्या पुणे भेटीत खुद्द पवार यांनीच अभंग यांना या विषयांवर नंतर बोलू’ असे सांगत पाचपुते प्रकरणाकडे सपशेल कानाडोळा केला. पाचपुते आता काय भूमिका घेतात याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पराभवानंतर दक्षिण जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले. पक्ष विरोधी कारवाया केल्याच्या संशयावरून पक्षातून आ. पाचपुते यांची कोंडी करण्यात आली असल्याची चर्चा आहे. यावरून नाराज झालेले पाचपुते थेट पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. कार्यकर्त्यांना याची मानसिकता तयार करून कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, पाचपुते यांच्या संभाव्य बंडाबाबत पक्षातून एकाही नेत्याने जाहीरपणे दखल घेतलेली नाही. पक्षीय पातळीवर असणाऱ्या शांततेमुळे पाचपुते सध्यातरी एकाकी पडल्याचे चित्र आहे. श्रीगोंदा तालुक्यातील सर्वच विरोधकांकडून पाचपुते यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात येत असून ते पक्षाला इमोशनल ब्लॅकमेल करीत आहेत. त्यांचा नाराजीनामा हा त्यांचा नौटंकीपणा आहे. साईकृपा कारखान्याला कर्ज दिले नसल्याच्या नावाखाली सत्तेची खुर्ची टिकविण्यासाठी त्यांची धडपड आहे. बारामतीसारखा विकास करण्याचे स्वप्न दाखविणाऱ्या पाचपुते यांनी घोषणांचा पाऊस पाडला. विकासाऐवजी तालुका भकास केल्याचा आरोप जनसेवा विकास मंडळाचे अध्यक्ष घनशाम शेलार यांंनी केला आहे. नाराजीनाम्यानंतरही पक्षाकडून दखल घेतली गेली नसल्याने पाचपुते शांत आहेत. त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही यामुळे पक्षासह पाचपुते यांनीही आपले पत्ते बंद ठेवले आहेत. (प्रतिनिधी)पुण्यात शनिवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात आपण आ. बबनराव पाचपुते प्रकरण त्यांच्या कानावर टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी पवार यांनी या विषयांवर १५ तारखेनंतर सविस्तर चर्चा करू असे स्पष्टपणे सांगितले. -पांडुरंग अभंग, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस