शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महापौर पदासंदर्भात पवारांचे गुफ्तगू

By admin | Updated: May 16, 2016 23:25 IST

अहमदनगर : महापौरपदाची निवडणूक जूनमध्ये होत असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जगताप-कळमकर यांच्याशी आगामी निवडणुकीसंदर्भात सोमवारी येथे गुफ्तगू केले.

कामाला लागण्याचा आदेश : ऐनवेळी शीतल जगताप यांची उमेदवारी?अहमदनगर : महापौरपदाची निवडणूक जूनमध्ये होत असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जगताप-कळमकर यांच्याशी आगामी निवडणुकीसंदर्भात सोमवारी येथे गुफ्तगू केले. महापौर पदाच्या निवडणुकीच्यादृष्टीने कामाला लागा, असा आदेश त्यांनी दिला असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.महापौर पदासाठी सुवर्णा कोतकर व नीता घुले यांनी नकार दर्शविल्याची माहिती असून ऐनवेळी आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शीतल या महापौर पदाच्या उमेदवार असतील, अशीही चर्चा सुरु झाली आहे. दिवंगत शंकरराव घुले कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी पवार नगरला आले होते. या भेटीनंतर पवार हे दादा कळमकर यांच्या निवासस्थानी थांबले होते. तेथे त्यांनी शहराची बदललेली राजकीय गणिते समजून घेतली. जून महिन्यात महापौर पदाची निवडणूक होत असून महापालिकेतील राजकीय गणित काय? कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक आहेत, याची विचारणा पवार यांनी केली. आमदार अरुण जगताप, दादा कळमकर यांनी सार्वत्रिक निवडणूक ते पोटनिवडणुकीनंतरची राजकीय परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली. त्यानंतर पवार यांनी कामाला लागण्याचा आदेश दिला. दोन्ही कॉंग्रेसकडून महापौर पदाचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. कॉँग्रेसच्या उपमहापौर सुवर्णा कोतकर यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांच्या कुटूंबातून अद्याप ‘होकार’ मिळालेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार कोतकर कुटुंब इच्छूक नाही. नीता घुले यांचे नाव चर्चेत असले तरी गणिते जुळविण्यासाठी ते तयार होतील का? हा प्रश्न आहे. त्यामुळे ऐनवेळी आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शीतल यांचे नाव समोर येण्याची शक्यताही वर्तवली जाते. जगताप गणिते जुळवितात असा आजवरचा अनुभव असल्याने राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक निर्धास्त आहेत. (प्रतिनिधी)भाजपची भूमिका काय? भाजपचे नेते दिलीप गांधी व शिवाजी कर्डिले काय भूमिका घेतात याकडेही लक्ष लागले आहे. गांधी यांचे सेनेशी जमत नाही व जगताप यांच्याशी सख्य आहे. शिवाजी कर्डिले यांचीही भूमिका जगताप व कोतकर या दोन्ही परिवारांबाबत सौम्यच असते. ते भाजपपेक्षा ‘सोधा’ पक्ष जपतात. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादीच मुसंडी मारेल, अशी चर्चा सुरु झाली आहे.