अहमदनगर : राहण्याची व जेवनाची सोय नसल्याने अनेक रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होत नाहीत. मात्र कोविड केअर सेंटरमध्ये दररोज रुग्णांना दमदार नाष्टा आणि पौष्टिक जेवन दिले जात असून, घरच्यापेक्षाही चांगली सोय होती. त्यामुळे घरचे डबे मागविणेही बंद केले, अशी माहिती कोविड केअर सेंटरमधून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांकडून सांगण्यात आले.
कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येत आहे. कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केल्यानंतर कुटुंबातील सदस्याप्रमाणे रुग्णाची काळजी घेतली जात आहे. सकाळी नाष्टा, दुपारचे आणि संध्याकाळच्या जेवनाच्या वेळा निश्चित केल्या गेल्या आहेत. त्यानुसार वेळेवर रुग्णांना नाष्टा व जेवन पोहोच होते. जेवनाच्या वेळेत बदल होत नाही. वेळेवर जेवन मिळते. नाष्टा व जेवानासाठी वाट पाहावी लागत नाही, असे कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांकडून सांगण्यात आले. यामुळे अनेक रुग्ण लवकर बरे होत आहेत. जेवनासोबतच रुग्णांमधील भीती दूर करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. काही ठिकाणी प्रवचन कीर्तन, जादूचे प्रयोग आदी कार्यक्रम सादर केले जात असल्याने सात दिवस कसे निघून जातात, ते कळतही नाही, असे काही रुग्णांनी सांगितले.
कोविड केअर सेंटरमध्ये सामाजिक संस्थांकडून जेवन पोहोच गेले जात आहे. रुग्णांना जेवन पुरविण्यासाठी हजारो हात राबत आहेत. जेवन तयार करणे, ते रुग्णांपर्यंत पोहोच करणे यांसारखी काही अनेक सामाजिक कार्यकर्ते विनामाेबदला काम करत आहेत. येथील घर घर लंगर सेवा, या संस्थेच्या वतीने महापालिकेच्या नटराज व जैन पितळे बोर्डिंग कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना मोफत नाष्टा, जेवन पुरविले जात आहे. हे जेवन उत्तम असल्याने काहींनी तर घरचे डबे मागविणे बंद केल्याचे सांगण्यात आले.
....
वाळूज येथील कोविड केअर सेंटरमध्ये चमचमीत जेवन
कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत नाष्टा, जेवन आणि फळांचेही वाटप करण्यात येते. तेथील रुग्णांशी संपर्क केला असता त्यांनी चहा, नाष्टा आणि जेवनाच्या वेळांबाबत माहिती दिली.
........................
असे मिळते जेवन
सकाळी ८.३० वा-नाष्टा-उपमा, पोहो, दोन अंडी, चहा
दुपारी-१२. ३० वाजता-जेवन-दोन भाज्या, भात, वरण, पोळ्या
दुपारी-३ वाजता-कलिंगड, खरबूज, चिक्कू आदी फळांचे वाटप
संध्याकाळी-४ वाजता-चहा बिस्किट
रात्री-८वाजता- जेवन-दोन भाज्या, भात, पोळ्या
.....
भाळवणी येथील शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिरात दमदार जेवन
आमदार नीलेश लंके यांच्या भाळवणी येथे शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर या नावाने कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या सेंटरमध्ये रुग्णांनी वेळेवर आणि उत्तम प्रकारचे जेवन मिळत असल्याचे सांगितले.
..............................
असे आहे व्यवस्थापन
सकाळी - ८.३० वा- नाष्टा- उपमा किंवा पोहे, दोन अंडी
दुपारी १२.३० वाजता-जेवन-दोन वेगवेगळ्या भाज्या. मसाले भात, पोळ्या
दुपारी-३ वाजता- कलिंगड, खरबूज, चिक्कू, सफरचंद आदी फळांचे वाटप
संध्याकाळी-८ वाजता- जेवन-दोन वेगवेगळ्या भाज्या, भात, वरण, चपाती
....
नटराज कोविड केअर सेंटरमध्ये रुचकर जेवन
महापालिका व घर घर लंगर सेवेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमधून बरे होऊन घरी आलेल्या रुग्णाशी संपर्क साधला असता दररोज वेगवेगळे आणि वेळेवर जेवन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
.................
असे आहे नियोजन
सकाळी ८.३० ते ९ यावेळेत नाष्टा- उपमा किंवा पोहे,
दुपारी १ वाजता जेवन-दोन वेगवेगळ्या भाज्या, मसाले भात, चपाती
संध्याकाळी- ७.३० वाजता- जेवन दोन वेगवेळ्या भाज्या, भात, चपाती
.......
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये वेळेवर जेवन
महापालिकेच्या वतीने येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संपर्क केला असता वेळेवर जेवन व नाष्टा दिला जात असल्याचे सांगण्यात आले.
..........................
असे आहे नियोजन
सकाळी ८ वाजता नाष्टा- उपमा किंवा पोहे
दुपारी १ वाजता- जेवन- भाजी, पोळी, वरण भात
दुपारी ३.३० वाजता- चहा
सायंकाळी- ७. ३० वाजता- भाजी, पोळी, मसाले भात
.....
सूचना फोटो मेलवर आहे.