शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या गुन्ह्याचा कट रचणा-या पाथर्डी पोलीस निरीक्षकाची तत्काळ बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 15:19 IST

पाथर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी पाथर्डीच्या पोलीस निरीक्षकांनीच काही व्यक्तींशी संगनमत करत कट रचला, असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

अहमदनगर : पाथर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी पाथर्डीच्या पोलीस निरीक्षकांनीच काही व्यक्तींशी संगनमत करत कट रचला, असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याची बातमी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पाथर्डीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांची तडकाफडकी बदली केली आहे.किसन आव्हाड व त्यांच्या पत्नी शालिनी आव्हाड यांनी बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना निवेदन दिले होते़ फोनवर संभाषण करणारे पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण तर दुसरा व्यक्ती हा विजय आव्हाड (पाथर्डी) असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. राजेंद्र चव्हाण व विजय आव्हाड यांच्यात गत १० जानेवारीला रात्री ११ वाजेच्या सुमारास फोनवर संभाषण झाल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. स्पिकर फोनवर हे संभाषण झाले असल्याने ते स्पष्टपणे ऐकू येते. पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण व विजय आव्हाड यांनी संगनमत करत आपणाला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा कट रचला होता. १० जानेवारीला गेवराई तालुक्यातील काही महिलांना हाताशी धरून त्यांच्यामार्फत ही फिर्याद दाखल केली जाणार होती. या महिला पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आल्याही होत्या. मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित शिवथरे यांना त्यांच्या माहितीत तफावत आढळल्याने गुन्हा दाखल झाला नाही, असे या तक्रारी आव्हाड यांनी म्हटले आहे. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी चव्हाण यांची तातडीने मानवी तस्करी प्रतिबंधक विभागत बदली करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीahmednagar policeअहमदनगर पोलीस