शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
4
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
5
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
6
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
7
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
8
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
9
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
10
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
11
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
12
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
13
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
14
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
15
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
16
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
17
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
18
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
19
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
20
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर

पाथर्डीत राबतोय कॉपी रॅकेटमधून पासिंग फॉर्म्युला; बारावी परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 16:09 IST

बारावीची परीक्षा मंगळवारी सर्वत्र सुरु झाली. पहिल्याच पेपरला विद्यार्थ्यांसाठी कॉपी रॅकेटमधून हमखास पासिंग फॉर्म्युला राबविण्यात येत असल्याचे चित्र पाथर्डी तालुक्यात दिसले. मित्र कंपनी, पालक देखील बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्यात व्यस्त होते.

हरिहर गर्जे । पाथर्डी : बारावीची परीक्षा मंगळवारी सर्वत्र सुरु झाली. पहिल्याच पेपरला विद्यार्थ्यांसाठी कॉपी रॅकेटमधून हमखास पासिंग फॉर्म्युला राबविण्यात येत असल्याचे चित्र पाथर्डी तालुक्यात दिसले. मित्र कंपनी, पालक देखील बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्यात व्यस्त होते. परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर परजिल्ह्यातील वाहने व विद्यार्थी पाथर्डीत दाखल झाले आहेत. बारावी परीक्षेसाठी पाथर्डी तालुक्यातील १० परीक्षा केंद्रातून ६ हजार २८७ परीक्षार्थी परीक्षा देत आहेत. शहरासह तालुक्यात बारावी परीक्षेच्या पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका अवघ्या ३० मिनिटात पोलीस ठाण्याच्या समोरील झेरॉक्स सेंटरवर आली होती. तेथे उत्तर पत्रिका घेण्यासाठी युवकांनी मोठी गर्दी केली होती. बाबूजी आव्हाड महाविद्यालयात बाहेरून पोलीस बंदोबस्त होता. मात्र महाविद्यालयाच्या मागील गेटमधून काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मुख्य इमारतीच्या शेजारील खोल्यामध्ये उत्तर पत्रिकाच्या झेरॉक्स करून विद्यार्थ्यांना वाटत होते. वसंतदादा, एम.एम.नि-हाळी विद्यालयात कॉपी पुरवणाºया युवकांची मोठी गर्दी होती. अपुरा पोलीस बंदोबस्ताचा फायदा घेत पोलिसांना न जुमानता  काही युवक परीक्षार्र्थींना कॉपी पुरवत होते. परीक्षा केंद्राबाहेर राज्यातील विविध जिल्ह्याच्या पासिंग असलेल्या चारचाकी अलिशान वाहनाच्या रांगा होत्या. त्यामुळे परीक्षा सुरु होताना व संपल्यानंतर वाहतूक कोंडी झाली होती. श्रीतिलोक जैन विद्यालयात तहसील कार्यालयाच्या आवारातून पोलीस मित्राच्या मदतीने महिला पालक देखील आपल्या पाल्याला कॉपी पुरवत होते. तनपुरवाडी येथील न्यू भगवान आर्टस, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स कॉलेज परीक्षा केंद्रात महसूल विभागात नोकरीला असलेला भरारी पथकातील कर्मचारी चक्क शिक्षकांना कॉपी पुरविण्याच्या सूचना देत होता. काही कर्मचारी परीक्षा केंद्राच्या गेटवर येऊन पालकांकडून कॉपी घेऊन ती विद्यार्थ्यांना पुरवत होते. या परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरवणाºया हुल्लड युवकांच्या आरडाओरड्यामुळे परीक्षा केंद्राला जत्रेचे स्वरूप आले होते. खिडक्याच्या बाहेर अक्षरश: पुस्तकांचा व कॉपीचा खच पडला होता. बारावी परीक्षेमुळे शिक्षण संस्थांसह हॉटेल, लॉज, बिअरबार या व्यवसायांना चांगले दिवस आले आहेत, असे चित्र पाथर्डीत होते.कॉपी करण्यास सहकार्य करणा-या संस्थांचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास कळवला जाणार आहे. कॉपी थांबविण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्यात येतील, असे पाथर्डीचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांनी सांगितले.    

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीexamपरीक्षाStudentविद्यार्थी