पालिकेच्या परमवीर शहीद अब्दुल हमीद उर्दू शाळेत आयोजित पालक शिक्षक सहविचार सभेत दिवे बोलत होते. यावेळी मौलाना हाफिज मोहम्मद जोहर अली, मुख्याध्यापक सलीमखान पठाण उपस्थित होते.
दिवे म्हणाले, ‘‘शाळा कधी सुरू होणार, हे कुणालाही सांगता येणार नाही. शाळा बंद तर शिक्षण सुरू आहे. मुलांना ज्ञानप्राप्ती होण्यासाठी पालकांनी टीव्ही कमी पाहवा. त्याऐवजी मुलांच्या अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावे. त्यांना गुंतवून ठेवावे. उर्दू शाळेचे काम तालुक्यामध्ये नेत्रदीपक असून, या येथून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. कोरोनामुळे जगाचे सर्व चित्र पालटले आहे. ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू असला तरी पालकांच्या सहकार्याशिवाय तो पूर्णत्वास जाणार नाही. शिक्षक वर्ग आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत आहेत. पालकांनीसुद्धा आपल्या मुलांसाठी शिक्षकांना सहकार्य केले पाहिजे. पालकांनीच आता आपल्या पाल्याचे शिक्षक व्हावयाचे आहे.
प्रास्तविक शिक्षिका शाहीन शेख यांनी केले. सूत्रसंचालन आसिफ मुर्तुजा यांनी केले तर आभार फारुक शाह यांनी मानले. वहिदा सय्यद, नसरीन इनामदार, शाहीन शेख, आस्मा पटेल, निलोफर शेख, बशिरा पठाण, मिनाज शेख, एजाज चौधरी उपस्थित होते.
----------