अहमदनगर : जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बनावट दारू तयार करून तिचे वितरण केले जात होते़ पांगरमल येथील पार्टीसाठीच्या चार बॉक्सपैकी एका बॉक्समधील बाटल्यांमध्ये रसायनाचा ओव्हरडोस पडल्याने २५ ते ३० जणांना विषबाधा झाली़ त्यात सात जणांचा बळी गेला असून, दहा जणांची मृत्यूशी झुंज सुरू आहे़पोलिसांनी शनिवारी रात्री सातव्या आरोपीला अटक केली़ आतापर्यंत जाकीर शेख, हनिफ शेख, जितू गंभीर, मोहन दुग्गल, त्याचा मुलगा संदीप, वैभव जाधव व भरत जोशी यांना अटक केली आहे़ नांदेड पोलिसांनी शनिवारी मोहन दुग्गलसह तिघांना ताब्यात घेतले़ चौघा आरोपींना रविवारी २२ फेब्रुवारीपर्यंत कोठडी देण्यात आली. कॅन्टीनमध्ये मोहन आणि भरत हे बनावट दारू बनवित होते. इतर आरोपी दारूचे वितरण करायचे़ शिवसेनेचा उपजिल्हाप्रमुख भीमराज आव्हाड याने पार्टीसाठी ही दारू खरेदी केली होती. रावसाहेब आव्हाड पोलिसांच्या ताब्यात पांगरमल दारूकांड प्रकरणात भीमराज आव्हाडसह त्याचा भाऊ रावसाहेब याच्यावरही गुन्हा दाखल आहे़ पार्टीत त्यालाही विषारी दारूची बाधा झाल्याने त्याच्यावर नगरला उपचार सुरू होते़ त्याची प्रकृती ठीक झाल्याने रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे़ दारू वाहतुकीसाठी रुग्णवाहिकांचा वापर जिल्हा रुग्णालयात तयार होणाऱ्या बनावट दारूच्या वाहतुकीसाठी रुग्णवाहिकांचा वापर होत असल्याची चर्चा आहे़ पोलीस त्याचाही तपास करत आहेत़
रसायनाच्या ‘ओव्हरडोस’ने नगरला मृत्युकांड!
By admin | Updated: February 20, 2017 04:01 IST