.....
मास्क व सॅनिटायझरचे वाटप
अहमदनगर : राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रकाश भागानगरे यांच्या वतीने सारसनगर भागातील ज्येष्ठ नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी पू.म.स. कंचन कंवरजी मसा, नगरसेवक गणेश भोसले, तात्यासाहेब दरेकर, नंदकुमार देशमुख, हिराभाऊ धोंडे, प्रकाश इवळे, टी. पी. शिंदे, भाऊसाहेब वाडेकर, अशोक म्हस्के, बाजीराव काळे, शंकर फुलसौंदर, मोहन सईद, डॉ. अरविंद वाघमारे, नित्यानंद कांबळे, शिवाजी विधाते, प्रभाताई भोग, शांतीलाल गांधी,
विनोद बलदोटा, छबुराव कांडेकर आदी उपस्थित होते.
.....
पाणी योजनेचे काम पूर्ण करण्याचा आदेश
अहमदनगर : शहर पाणीपुरवठा योजनेचे काम येत्या ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी गुरुवारी बैठकीत दिला. वसंत टेकडी येथील जलकुंभाची पाहणी केल्यानंतर झालेल्या बैठकीत वाकळे यांनी योजनेचे काम पूर्ण करण्याचा आदेश दिला.
......