....
नियोजनकडून ६१ लाख
अहमदनगर : जिल्हा नियोजन समितीकडून आग प्रतिबंधक उपकरणे खरेदीसाठी महापालिकेला ६१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीतून पुरवठा विभाग साहित्य खरेदी करणार असून, यामुळे या विभागाला बळकटी मिळण्यास मदत होणार आहे.
....
केंद्रीय पथकाची प्रतीक्षा
अहमदनगर : महापालिकेच्या वतीने शहर व परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून, केंद्रीय पथकाडून शहराची पाहणी करण्यात येणार आहे. हे पथक कधी येते, याची प्रतीक्षा महापालिकेला आहे.
....
साइडपट्ट्यांचे काम थांबले
अहमदनगर : नगर- औरंगाबाद महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या साइडपट्ट्यांचे काम मध्यंतरी हाती घेण्यात आले होते. मात्र, हे काम थांबविण्यात आले असून, साइडपट्ट्यांचे काम पूर्ण न झाल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साइडपट्ट्यांचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
...
जालिंदर बोरुडे यांचा गौरव
अहमदनगर : दिल्ली येथील राष्ट्रीय अंधत्व निवारण समितीचा नेत्रसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांचा खासदार डॉ. सुजय विखे यांनी सत्कार केला. यावेळी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी नगरसेवक धनंजय जाधव आदी उपस्थित होते.
....
वसुलीचा आढावा
अहमदनगर : महापालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयांनी केलेल्या वसुलीचा आढावा उपायुक्त संतोष लांडगे यांनी घेतला असून, शहर व परिसरात अनधिकृत पत्र्याचे शेड थाटण्यात आली आहेत. अशा दुकानांना कर लागू करण्यात आला असून, कर लागू करण्यात आलेल्या दुकानांची संख्या १,३०० वर पोहोचली आहे.