शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपनीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 12:52 IST

अपघातग्रस्ताला नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करणा-या विमा कंपनीची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश कोपरगाव येथील मोटार अपघात न्यायाधिकरणाने दिले आहे़ 

अहमदनगर : अपघातग्रस्ताला नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करणा-या विमा कंपनीची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश कोपरगाव येथील मोटार अपघात न्यायाधिकरणाने दिले आहे़ न्यायाधीश एऩएऩ श्रीमंगले यांनी हा आदेश दिला असून, या प्रकरणात अर्जदारातर्फे अ‍ॅड़ सुरेश लगड व अ‍ॅड़ अशोक वहाडणे यांनी काम पाहिले़ कोपरगाव तातुक्यातील धोत्रे येथील शेतकरी रमेश छबुराव गवारे (वय ५२) यांचा १५ मार्च २०१५ रोजी बाभळेश्वर परिसरात अपघात झाला होता़ त्यांच्या मोटारसायकलला मॅक्झिमा मिनी व्हॅनने धडक दिल्याने हा अपघात झाला होता़ या अपघातात गवारे हे कायमस्वरुपी अधू झाले़ याप्रकरणी पोलिसांनी तपास करून व्हॅन चालकाविरोधात गुन्हा दाखल करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ दरम्यान गवारे यांनी न्यायालयात मोटार अपघात नुकसानभरपाईसाठी अर्ज केला होता़ यावर सुनावणी होऊन न्यायालयाने अपघातास कारणीभूत ठरलेल्या व्हॅनची विमा कंपनी इफको टोकिओ जनरल इन्शुरन्सने अपघातग्रस्ताला ७ लाख १२ हजार ८५६ रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले होते़ कंपनीने मात्र हे पैसे न दिल्याने गवारे यांनी अ‍ॅड़ लगड यांच्यामार्फत न्यायालयात दाद मागितली होती़  सदर विमा कंपनीची व्याजासह १० लाख ४ हजार ६५६ रुपयांची   जंगम मालमत्ता जप्त करावी, अशी मागणी अर्जदाराच्यावतीने करण्यात आली होती़ यावर न्यायालयाने कंपनीचे मालमत्ता जप्तीचे आदेश दिले आहेत़ 

टॅग्स :Courtन्यायालयAhmednagarअहमदनगर