शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखूमुळे तरुणांना घेरलंय तोंडाच्या कॅन्सरने; रुग्णांच्या टक्केवारीत ४३ टक्के रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 13:31 IST

कर्करोग म्हणजेच कॅन्सरवर उपचार असले तरी जगातील गंभीर आजारांमध्ये कॅन्सरचा समावेश होतो. अशा कॅन्सर आजाराने तरुणांना मोठ्या प्रमाणात घेरल्याची आकडेवारी समोर आली आहे. एकूण रुग्णांच्या टक्केवारीत जवळपास ४३ टक्के रुग्ण तरुण आढळून येतात. 

विशेष मुलाखत / साहेबराव नरसाळे । अहमदनगर : कर्करोग म्हणजेच कॅन्सरवर उपचार असले तरी जगातील गंभीर आजारांमध्ये कॅन्सरचा समावेश होतो. अशा कॅन्सर आजाराने तरुणांना मोठ्या प्रमाणात घेरल्याची आकडेवारी समोर आली आहे. एकूण रुग्णांच्या टक्केवारीत जवळपास ४३ टक्के रुग्ण तरुण आढळून येतात.  यात तंबाखूमुळे होणा-या कर्करोगाचे प्रमाण ४१़५ टक्क्यांपर्यंत असल्याचे डॉ़. रत्ना चव्हाण- नजन सांगतात.  प्रश्न : तंबाखू हेच मौखिक कर्करोगाला कारण ठरते का? उत्तर : कर्करोगाचे विविध प्रकार पडतात. त्यातील मौखिक कर्करोग हा अधिक गंभीर मानला जातो़. त्याचे कारण मौखिक कर्करोग हा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होतो आणि त्याचेच प्रमाण अधिक आहे़. त्यामुळे भारतात तरी ही समस्या अधिक गंभीर आहे. ४१़५ टक्के कर्करोग हा तंबाखूमुळे होतो़. म्हणजे जे कोणी म्हणत असतात ना की तंबाखूमुळे कर्करोग होत नाही, त्यांनी ही आकडेवारी गांभीर्याने पहायला हवी़. या आकडेवारीवरुन तरी तंबाखू हेच मौखिक कर्करोगाला कारणीभूत ठरत आहे, असे दिसते़.  प्रश्न : मौखिक कर्करोगाची कारणे काय आहेत? उत्तर : तंबाखू, कात, पान मसाला, गुटखा, धुम्रपान, रासायनिक पदार्थांचे अतिरिक्त सेवन ही मौखिक कर्करोगाची प्रमुख कारणे आहेत. तोंडातील चट्ट्यांच्या प्रकारावरुन मौखिक कर्करोगाचे निदान करता येते़. तोंडामध्ये ज्या ठिकाणी तंबाखू ठेवली जाते, तेथे हा चट्टा आढळतो. त्याला ल्युकोप्लेकिया असं संबोधतात. गडद लाल रंगाचा वेलवेटसारखा चट्ट्याला इरिथोप्लेकिया म्हणतात. काही चट्टे सफेद, समांतर रेषांसारखे दिसतात. तोंडात चट्टे आल्यानंतर तिखट, मसालेदार पदार्थ सहन न होणे, तोंडाचा दाह होणे, जीभ व टाळूवर फोड येणे, तोंडाची लवचिकता कमी होणे, गालाच्या आतील बाजूला पांढरट, जाडसर पट्टे बनतात. यामुळे तोंड पूर्णपणे उघडत नाही.  कृत्रिम रंगही कॅन्सरला कारक ?आज अनेकजण अन्नाला विशिष्ट रंग यावा, यासाठी कृत्रिम रंग वापरले जातात. हा कृत्रिम रंगही तोंडाच्या कॅन्सरला निमंत्रण ठरु शकतो. त्याशिवाय रासायनिक घटक असलेले पदार्थ, शीतपेये, फास्टफूड, प्लास्टिक पॅकेटमधील पदार्थ खाणे टाळले पाहिजे़. उपाय काय ?मौखिक कर्करोगाची लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवा़ प्राथमिक चाचण्या, बायोप्सी, लॅब टेस्ट करुन घ्या. कॅन्सरचे निदान झाल्यास पुढील उपचार सुरु करता येतात. दिवसात २-३ लिटर पाणी प्यावे़. भरपूर फळे, पालेभाज्या खाव्यात व व्यायाम करावा. जेवणाच्या वेळा पाळाव्यात़ तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन कटाक्षाने टाळावे़. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcancerकर्करोगinterviewमुलाखतdoctorडॉक्टर