शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग महापालिकेकडे घेण्यास विरोध

By admin | Updated: March 16, 2016 23:57 IST

अहमदनगर : महापालिकेच्या ताब्यात (अवर्गीकृत) घेण्याच्या विषयाला सभागृहातून विरोध दर्शविण्यात आल्यानंतर तो विषय रद्द करण्याचा निर्णय महापौर तथा पीठासीन अधिकारी अभिषेक कळमकर यांनी घेतला.

अहमदनगर : शहरातून जाणारे राष्ट्रीय/राज्यमार्ग महापालिकेच्या ताब्यात (अवर्गीकृत) घेण्याच्या विषयाला सभागृहातून विरोध दर्शविण्यात आल्यानंतर तो विषय रद्द करण्याचा निर्णय महापौर तथा पीठासीन अधिकारी अभिषेक कळमकर यांनी घेतला. गंगा उद्यानाशेजारी मनोरंजन पार्क अथवा वॉटर पार्क करण्याच्या विषयाला सभेने मंजुरी दिली. मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करण्याच्या विषयावर झालेली किरकोळ वादावादी वगळता सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. महापालिकेची महासभा बुधवारी महापौर अभिषेक कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करण्याच्या विषयाला सत्तापक्षाचे नगरसेवक दीप चव्हाण व विरोधी पक्षाने कडाडून विरोध केला. सभागृहात झालेला ठराव प्रत्यक्षात कागदावर उतरला जात नाही. त्याला ‘तसेच’ म्हणून आणखी जोड दिला जातो असे सांगत भाजप नगरसेवक अ‍ॅड. अभय आगरकर यांनी सभागृहात पुरावेच सादर केले. सर्जेपुरातील रंगभवनातील गाळे हस्तांतर व नूतनीकरणावर दीप चव्हाण यांनी ठरावातील विसंगती निदर्शनास आणून दिली. या गाळ्यांसदर्भात सत्ता पक्षाचे दीप चव्हाण व अरीफ शेख यांच्यात शाब्दिक चकमक झाली. शहरातून जाणारे मनमाड, औरंगाबाद, पुणे, दौंड, कल्याण, विशाखापट्टणम, भूषणनगर लिंक रस्ता हे राष्ट्रीय/राज्यमार्ग महापालिकेच्या ताब्यात घेण्याचा विषय सभेसमोर होता. विषय उपस्थित होताच सभागृह नेते कुमार वाकळे यांनी हे रस्ते महापालिकेच्या ताब्यात आले तर त्यांची देखभाल दुरूस्तीचा खर्च मनपाकडून होणार नाही. शिवाय अतिक्रमणे वाढून पार्किंग व वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होईल असे सांगत विषयाला विरोध दर्शविला. सभागृह नेत्यांनीच विरोध दर्शविल्यानंतर विरोधकांची हवाच निघून गेली. भाजपच्या मालन ढोणे, सुवेंद्र गांधी, दीप चव्हाण, किशोर डागवाले, अभर आगरकर यांनी त्याला विरोध दर्शविला. आगरकर यांनी तर भाजप-सेनेचा या विषयाला विरोध असल्याचे जाहीर केले. केंद्र शासनाने या रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. हे रस्ते महापालिकेच्या ताब्यात आले तर हा निधी मिळण्यास अडचण होईल असे सुवेंद्र गांधी यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. सभागृहाचा कल पाहता तो विषय कळमकर यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला. गंगा उद्यानाशेजारी असलेल्या सव्वादोन एकर जागेवर बांधा, वापरा व हस्तांतर करा तत्वावर मनोरंजन पार्क किंवा वॉटर पार्क करण्याचा विषय महासभेत मंजूर करण्यात आला. या जागेवर स्वीमिंग टॅँक केला तर त्यासाठी राज्य शासनाकडून दोन कोटी रुपयांचा निधी आणून देऊ असे आश्वासन आगरकर यांनी सभागृहात दिले. मात्र त्या जागेवर न करता त्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन कळमकर यांनी दिले. (प्रतिनिधी)