नेवासा : नगरपंचायत आम्हाला नको तर शहराच्या विकासासाठी नगरपालिका किंवा नगरपरिषदच हवी अशी एकमुखी मागणी नेवासा खुर्दच्या ग्रामसभेत ठरावाद्वारे ग्रामस्थांनी केली़महाराष्ट्रात तालुक्याच्या ठिकाणी ग्रामपंचायतऐवजी नगरपरिषद, नगरपालिका करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर नेवासा शहराला नगरपंचायतीसाठी शासनाने मंजुरी दिली होती. यासंदर्भात ग्रामसभेद्वारे ग्रामस्थांची भूमिका विषद करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने नेवासा खुर्द ग्रामपंचायतमध्ये गुरुवारी (दि.१२) ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुशिलाताई लोखंडे या होत्या. प्रारंभी कै.गोपीनाथराव मुंडे, ज्येष्ठ व्यापारी बाळासाहेब नळकांडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ग्रामविकास अधिकारी बळीराम शेटेवाड यांनी ग्रामसभेतील मुख्य विषय नगरपालिका, नगरपरिषद असावी की नगर पंचायत असावी हा असल्याचे सांगितले़ त्यानंतर माजी सरपंच नंदकुमार पाटील यांनी नेवासा शहराच्या विकासाच्या दृष्टीने नगर परिषदच योग्य असल्याची भूमिका मांडली. त्यांच्या या भूमिकेला उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. सुधीर चव्हाण यांनी विकासाच्या दृष्टीने भूमिका विषद करून तिर्थक्षेत्र विकासाबरोबर शहराचाही विकास व्हावा म्हणून नगरपरिषद हाच पर्याय असल्याचे सांगितले. समर्पण फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले म्हणाले की, नेवासा शहराच्या विकासासाठी नगरपरिषद हाच पर्याय आहे, असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनाचे त्यांनी वाचन केले.ज्येष्ठ व्यापारी अशोकशेठ गुगळे म्हणाले की, नेवासा शहरात नगरपरिषद झाल्यास ९० टक्के शासनाच्या सवलती आपल्याला मिळेल. निधीदेखील मिळेल़ त्यामुळे नगरपरिषद होण्यासाठी व्यापाऱ्यांचा पाठींबा राहील़ याबाबत सतत पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते गणेश जाधव यांनी आपली भूमिका मांडली. ग्रामस्थांनाबरोबर घेऊन नगरपरिषद आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन जाधव यांनी दिले़ यावेळी उपसरपंच फारूक आतार, जानकीराम डौले, नितीन जगताप, जालींधर गवळी, शांताराम गायके, अंबादास लष्करे, ग्रा.पं. सदस्य सुनील धायजे, सतिष गायके, गणेश दारूंटे, मकरंद देशपांडे, राजेंद्र मापारी, योगेश रासने, लक्ष्मण दाणे, भास्करराव कणगरे, शिवा राजगिरे, गंगाराम पवार, कृष्णाभाऊ डहाळे, अरुण नजन, तुकाराम राजगीरे, बाबा कोरेकर, विकास चव्हाण, सुुलेमान मनियार, महेश पंडुरे, पवन गरूड, कृष्णा गायकवाड, नितीन ढवळे, नितीन खंडागळे आदी उपस्थित होते़ सतीष गायके यांनी आभार मानले.(तालुका प्रतिनिधी)महिला सदस्य गैरहजरया ग्रामसभेला सर्व महिला सदस्य गैरहजर होत्या. मात्र त्यांचे पती व नातेवाईक उपस्थित होते. नेहमीचेच हे म्हणून अनेकांनी यावेळी नाराजी व्यक्त केली़ व महिला सदस्यांना महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहण्याविषयी सूचना करण्याची मागणी ग्रामसभेत करण्यात आली.
नगर पंचायतीला विरोध
By admin | Updated: June 13, 2014 01:21 IST