लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : राज्यातील काही मंत्री मराठा आरक्षणाला विरोध करीत आहेत. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या मंत्र्यांच्या विरोधात मराठा महासंघाच्या वतीने ठोस भूमिका घेतली जाईल, असा इशारा भारतीय मराठा महासंघाचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी दिला आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या उत्तर विभागाचे प्रमुख संभाजी दहातोंडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी दक्षिण जिल्हाध्यक्ष बिभीषण खोसे, उत्तर जिल्हाध्यक्ष राज गवांदे, सचिव सुनील चौधरी, रावसाहेब मरकड, जिल्हा संघटक नाना डोंगरे, तालुकाध्यक्ष श्याम पवार, विकास लामखडे, अजिनाथ मोरे, सुनील निमसे, रवींद्र गंधाडे, भाऊसाहेब वाकचौरे, दिलीप थोरात, सतीश पठाडे, अनिकेत कराळे, सुनील देवकर, सोमवंशी, दत्ता शिंदे, ज्ञानेश्वर फसले, पुरुषोत्तम सूर्यवंशी, राजेंद्र म्हस्के, संतोष हंबर, डॉ. ज्ञानदेव कोरडे, वैभव ठाणगे, बाळासाहेब सालके उपस्थित होते. यावेळी दहातोंडे म्हणाले, मराठा महासंघाच्या मुख्य कार्यालयाची गिरगावला इमारत उभी करण्याचे काम सुरू आहे. मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांनी मोठा विश्वास दाखवून महत्त्वाची जबाबदारी सोपविली असून, या पदाच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दहातोंडे म्हणाले.
...
सूचना फोटो१२ दहातोंडे नावाने आहे.