शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

ऐतिहासिक खजिना खुला

By admin | Updated: May 29, 2014 00:28 IST

अहमदनगर : नगर शहर स्थापना दिनाचे औचित्य साधून मोगलकालीन व निजामशाही कालीन ऐतिहासिक खजिना असलेले आलमगीर संग्रहालय सर्वांसाठी खुले करण्यात आले.

अहमदनगर : नगर शहर स्थापना दिनाचे औचित्य साधून मोगलकालीन व निजामशाही कालीन ऐतिहासिक खजिना असलेले आलमगीर संग्रहालय सर्वांसाठी खुले करण्यात आले. या संग्रहालयामुळे शहराच्या ऐतिहासिक वैभवाचे जगभर प्रसारण होण्यास मदत मिळणार आहे. या निमित्ताने शहराच्या इतिहासावर आधारित तयार करण्यात आलेली चित्रफितही दाखवण्यात आली. शहर स्थापना दिनानिमित्त आलमगीर येथे निजामशाही कालीन अहमदनगर आणि मोगलकालीन अहमदनगर यावर आधारित ऐतिहासिक संग्रहालय उभारण्यात आले. विशेष म्हणजे मुगल बादशाह औरंगजेब ज्या बारादरी वास्तुत बसून राज्यकारभार करायचा त्याच वास्तुत हे संग्रहालय उभारण्यात आले. त्याचे उद्घाटन औरंगाबाद येथील मौलाना आजाद महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. मिर्जा खिजर, डॉ.मौलाना सदरूल हसन नदवी, प्रा.डॉ.ईकबाल काजी, मौलाना अख्तर कासमी, राजाराम भापकर गुरुजी, पत्रकार भूषण देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संस्थेचे प्रमुख शकूर शेख, इतिहास अभ्यासक फहिम सय्यद यांनी उपस्थितांचे स्वागत करून संग्रहालयाची माहिती दिली. काय-काय आहे संग्रहालयात आलमगीर संग्रहालयात बिबी चाँद सुलतानाचा मोगलांच्या हल्ल्यात शेवट कसा झाला याचा माहिती फलक लावण्यात आला आहे. मात्र याला कुठलाच ऐतिहासिक आधार नसून केवळ संभावनाच्या आधारे माहिती संकलित करून हा फलक बनवण्यात आला. या संग्रहालयात औरंगजेबाने स्वत: लिहिलेल्या पवित्र कुराण प्रतीसह हजारो दुर्मीळ ग्रंथ येथे पहावयास मिळणार आहेत. म्हैसूर सुलतान टिपू सुलतानच्या काळातील तलवारही येथे ठेवण्यात आली आहे. शहरातील सर्व ऐतिहासिक वास्तू त्यांची सचित्र माहिती, निजामशाहीतील सर्व बादशाह त्यांचा राजकीय प्रवास, मोगल बादशाह व त्यांचा कार्यकाळ, ऐतिहासिक नाणी, निजमाशाही दरबारातील सरदारांची माहिती आदी ऐतिहासिक खजिना येथे पहावयास मिळणार आहे. (प्रतिनिधी) नैसर्गिकपणे साचलेल्या पाण्यावर आधारित भूमिगत खापरी नळ पाणीपुरवठा योजना देशात सर्व प्रथम निजामशहाच्या काळात नगरमध्ये सुरू झाली. तसेच दक्षिणी उर्दूचा सर्वप्रथम ग्रंथ नगरमध्येच लिहिला गेल्याने या भाषेचे जन्मस्थानही नगरच आहे. याचा शहराला अभिमान असायला हवा. - प्रा.डॉ. मिर्जा खिजर, इतिहासाचे अभ्यासकनगर शहरात अलीकडच्या काळात संग्रहालयाची संख्या वाढत असल्याने नगरची संग्रहालयांचे शहर म्हणून नवीन ओळख होत आहे. ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, रणगाडा संग्रहालय, आनंदऋषीजी संग्रहालय, मेहेरबाबा संग्रहालय, व्ही.आर.डी.ई. संग्रहालय, लष्करी संग्रहालय आणि आता आलमगीर संग्रहालय.