शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

शिकल्या सवरल्यांचाच संसार टिकेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 18:29 IST

शिकले तितके हुकले’ या ग्रामीण भागातील म्हणीचा प्रत्यय येथील दिलासा सेलला वर्षभरात आला आहे़ २०१८ या वर्षात दिलासा सेलकडे पती-पत्नींमधील वादाच्या एकूण १५२३ तक्रारी दाखल झाल्या आहेत़

अरुण वाघमोडेअहमदनगर : ‘शिकले तितके हुकले’ या ग्रामीण भागातील म्हणीचा प्रत्यय येथील दिलासा सेलला वर्षभरात आला आहे़ २०१८ या वर्षात दिलासा सेलकडे पती-पत्नींमधील वादाच्या एकूण १५२३ तक्रारी दाखल झाल्या आहेत़ यातील १४१० जोडपे शिक्षित, सुशिक्षित ते उच्चशिक्षित आहेत़ विशेष म्हणजे नवविवाहित आणि ‘वेलसेट’ असलेल्या जोडप्यांमध्येच सर्वाधिक जास्त वाद होत असल्याचे या तक्रारींमधून समोर आले आहे़संकटग्रस्त महिलांना एकाच छताखाली कायदेशीर मदत मिळावी, या उद्देशाने तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या संकल्पनेतून १५ आॅगस्ट २०१७ रोजी येथील नगर-मनमाड रोडवर दिलासा सेल (वन स्टॉप सेंटर) स्थापन करण्यात आला आहे़२०१७ ते १८ या एक वर्षाच्या कालावधीत आपसातील वाद मिटविण्यासाठी १५२३ दाम्पत्यांनी दिलासा सेलकडे धाव घेत तक्रार दाखल केली़ यात २५५ पुरुषांनी तर १२६८ महिलांनी तक्रारी दाखल केल्या आहेत़ यात अशिक्षित असलेल्यांच्या अवघ्या ५१ तर पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण असलेल्यांच्या ६२ तक्रारी आहेत़उर्वरित १४१० तक्रारींमधील पती अथवा पत्नीचे शिक्षण बारावी ते उच्चपदवीधारक असे आहे़ या सुशिक्षित तक्रारदारांमध्ये बहुतांशी जण मोठ्या हुद्यांवर सरकारी अथवा खासगी क्षेत्रात नोकरी करत आहेत तर काहींचा स्वत:चा मोठा व्यवसाय असून, ते श्रीमंत घरातील आहेत़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर