कोरोनाचे संकटाला तोंड देण्यासाठी प्रतिकारशक्ती व ऑक्सिजन पातळी वाढविण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले. रचना फासाटे यांनी झूम मिटिंगद्वारे भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५ ते ६ असे दररोज एक तास असे सहा दिवस शिबिर घेतले.
सर्व प्रकारच्या योग प्राणायामबाबत आनंददायी व कृतिशील मार्गदर्शन करून शिक्षकांकडून हे योग प्राणायाम करून घेतले. सर्व प्रशिक्षणार्थी आपल्या कुटुंबासह यात सहभागी झाले होते. आदर्श गाव समितीचे प्रमुख पोपटराव पवार, शिक्षण संचालक दिनकर टेमकर, पद्मश्री राहीबाई पोपेरे, शिक्षणाधिकारी गुलाब सय्यद, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डी.डी. सूर्यवंशी, पाथर्डीचे गटशिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ, नेवासा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी कराड, शेवगावचे गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड, शिक्षण मंत्रालयाच्या गुणवत्ता कमिटीचे सदस्य विक्रम अडसूळ आदी यात सहभागी झाले होते.
शिबिराचे आयोजन उपक्रशील शिक्षक तुकाराम अडसूळ, आदर्श उपक्रमशील शिक्षिका शुभांगी शेलार यांनी केले. यासाठी तांत्रिक मदत योगेश सूर्यवंशी, प्रकाश फासाटे आणि अर्चना यांनी केली. उपक्रमशील शिक्षक राजू बनसोडे यांनी सर्वांचे आभार मानले. या सामाजिक उपक्रमाबद्दल रचना फासाटे यांचे अनेकांनी कौतुक केले आहे.