शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गर्दी टाळण्यासाठी आॅनलाईन औषधोपचार देण्याची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 15:48 IST

अहमदनगर : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी गर्दी करू नये, म्हणून सुचना केल्या जात आहेत. हाच धागा पकडून आरोग्य विभागाने एक पाऊल पुढे जात आॅनलाईन औषधोपचार देण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिलेली आहे. घर बसल्या सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० पर्यंत नागरिक ‘ई-संजिवणीओपीडी.कॉम’ या वेब साईटवर जावून डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात.  

अहमदनगर : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी गर्दी करू नये, म्हणून सुचना केल्या जात आहेत. हाच धागा पकडून आरोग्य विभागाने एक पाऊल पुढे जात आॅनलाईन औषधोपचार देण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिलेली आहे. घर बसल्या सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० पर्यंत नागरिक ‘ई-संजिवणीओपीडी.कॉम’ या वेब साईटवर जावून डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात.  किरकोळ आजारांसाठी ही सुविधा असून याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

नॅशनल टेलीकन्सल्टेशन सर्व्हीसच्या (राष्ट्रीय दुरसंपर्क सेवा) वतीने ‘ई-संजिवणीओपीडी.कॉम’ ही वेब साईट तयार करण्यात आलेली आहे. देशातील प्रत्येक व्यक्तील घर बसल्या किरकोळ आजारांवर मार्गदर्शन आणि सल्ला दिला जात आहे. प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळी वेळ ठरवून दिलेले असून महाराष्ट्रासाठी सकाळी साडे आठ ते दुपारी साडे बारापर्यंतची वेळ आहे. याच लोक त्यांच्याशी संवाद साधून उपचार घेऊ शकतात.दरम्यान, सध्या लॉकडाऊन आहे. त्यातच सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे घर बसल्या उपचार घेण्यासाठी ही वेब साईट अत्यंत लाभदायक आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही सुविध मागील काही दिवसांपासून सूरू केली असली तरी याचा सध्या मोठ्या प्रमाणात फायदा होऊ लागला आहे.  तज्ज्ञ डॉक्टर या साईटवर उपलब्ध राहत आहेत. आरोग्य विभागाचे आयुक्त अनुपकुमार यादव यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहनही केले आहे. जिल्ह्यातील व्यक्तींनीही याचा घरबसल्या लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी व नगर आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. ---कसा साधायचा संपर्क?गुगलमध्ये ई-संजिवणीओपीडी.कॉम ही साईट उघडावी. आपला मोबाईल क्रमांक टाकल्यावर ओटीपी येईल. तो त्यात टाकून पुढे आपले पूर्ण नाव, वय, जिल्हा, राज्याची निवड करावी. त्यानंतर आपला आजार काय आणि काय मार्गदर्शन हवे, याबाबत बातचित करावी. आपल्या आजाराबद्दल सुरूवातीला दिलेल्या मोबाईल क्रमांकावर आपल्याला औषधांची नावे येतात. ही सुविधा घरबसल्या उपचार घेण्यासाठी महत्वपूर्ण आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले जात आहे.