शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सहकारी संस्थांचा कारभार आॅनलाईन

By admin | Updated: August 31, 2023 13:49 IST

ज्ञानेदश दुधाडे, अहमदनगर जिल्हा परिषद, महसूलच्या धर्तीवर सहकार विभागाने सहकारी संस्थांचा कारभार आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्ञानेदश दुधाडे, अहमदनगरजिल्हा परिषद, महसूलच्या धर्तीवर सहकार विभागाने सहकारी संस्थांचा कारभार आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. सहकाराचा बालेकिल्ला असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील ९ हजार ३२२ सहकारी संस्था आणि डेअरी यांना आपली दैनंदिन माहिती संगणकावर आॅनलाईन भरावी लागणार आहे.महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९ नुसार सहकारी संस्थांचे कामकाज आॅनलाईन करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले होते. त्यानुसार राज्यात अशा पध्दतीने सहकारी संस्था आणि दूध डेअरी यांची माहिती आॅनलाईन पध्दतीने संकलित करण्यास सुरूवात झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात या वर्षीपासून आॅनलाईन पध्दतीने माहिती संकलित करण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात ९ हजार ३२२ सहकारी आणि दूध संस्था आहेत. यात ५ हजार ६४७ सहकारी संस्था आणि ३ हजार ६७५ दूध संस्थांचा समावेश आहे.यापैकी ५ हजार १३१ संस्थांचे कामकाज आॅनलाईन पध्दतीने सुरू झालेले असून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने त्यास मान्यता दिली आहे. २५४ संस्थांची मान्यता प्रलंबित असून ४०१ संस्थांनी मान्यतेसाठी विनंती केलेली आहे. १६९ संस्थांचे आॅनलाईन कामकाज रद्द करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. सहकारी संस्थांच्या आॅनलाईन माहितीमुळे संस्थेचा वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. सहकारी खात्याला आणि सर्वसामान्य व्यक्तीला संगणकाच्या एका क्लीकवर जिल्ह्यातील कोणत्याही संस्थेची माहिती पाहता येणार आहे. सहकार कायद्यानुसार अशा पध्दतीने आॅनलाईन माहिती न भरणाऱ्या संस्थेवर सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम १४६ नुसार दंडात्मक कारवाई अथवा संचालक मंडळ अपात्रतेच्या कारवाईस सामोरे जावे लागणार असल्याची माहिती उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी दिली. तसेच प्रत्येक सहकारी संस्थेला ३० सप्टेंबर पूर्वी सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक करण्यात आलेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सहकारी संस्था (दूध डेअरी, कुक्कुटपालन, मस्त्य व्यवसाय)नगर १२७८, पारनेर ७१३, श्रीगोंदा ८३२, कर्जत ७७७, जामखेड २७४, शेवगाव ३३७, पाथर्डी ५५६, नेवासा ५२५, राहुरी ५५८, संगमनेर १०३७, अकोले ६६६, कोपरगाव ७७०, श्रीरामपूर ५२० आणि राहाता ३१७ यांचा समावेश आहे.प्रत्येक संस्थेला संस्थेचा ताळेबंद, नफा तोटा पत्रक, नफा वाटपाचे नियोजन, उपविधी दुरूस्ती, वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख, निवडणुकीसंदर्भातील माहिती, लेखापरीक्षकाची नियुक्ती आॅनलाईन करावी लागणार आहे. संस्थांना आॅनलाईन प्रोफाईल तयार करावे लागणार. यात संस्थेचे नाव, पदाधिकारी, संस्थेचे आॅडिट कधी झाले, त्यामध्ये मिळालेली वर्गवारी, सर्वसाधारण सभेची माहिती सादर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.