शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नामांकित कंपनीचे कांदा बियाणे आढळले सदोष; तक्रार निवारण समितीचा अहवाल

By शिवाजी पवार | Updated: January 3, 2024 15:30 IST

शेतकऱ्याची पोलिसांत धाव

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : यावर्षीच्या रब्बी हंगामात नामांकित कंपनीच्या कांदा बियाणांची उगवण क्षमता नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. शेतकरी संघटनेच्या तक्रारीनंतर तालुका बियाणे तक्रार निवारण समितीने केलेल्या पाहणीमध्ये बियाणे सदोष आढळून आले. त्यावरून तालुका पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. 

 संघटनेचे तालुकाध्यक्ष युवराज जगताप यांच्या शेतात  कांदा  बियाणांची  उगवण झाली  नाही.  त्यानंतर  त्यांनी  याविरूद्ध  लढाई लढली. जिल्हा बीज गुण नियंत्रण अधिकारी व कंपनीच्या विरूद्ध शेतकऱ्यांच्या फसवणुकीची तक्रार त्यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे.       शेतकरी जगताप यांनी सहा किलो कांदा बियाणांची १६ ऑक्टोबर २०२३ मध्ये येथील एकाकृषी केंद्रातून खरेदी  केली होती. बियाणे खरेदीचे बिल त्यांनी केंद्राकडून घेतले. कारेगाव  येथील  शेतात  १०  नोव्हेंबरला  त्यांनी बियाणांची पेरणी केली. मात्र, २० वीस दिवस उलटूनही बियाणांची उगवण झाली नाही. त्यानंतर जगताप यांनी तालुका बियाणे तक्रार निवारण समितीकडे दाद मागितली. पंचायत समितीचे कृषी अधिकारी, तसेच तालुका कृषी अधिकारी हे  समितीचे कामकाज पाहतात.  

समितीने शेतात बियाणांची पाहणी केली. त्यानंतर बाभळेश्वर (ता.राहाता) येथील पायरेन्सचे डॉ. व्ही.एस. घुले, तंत्र अधिकारी अमोल काळे, कृषी अधिकारी अविनाश चंदन, अजित आनंद, डी.आर. गागरे, तसेच शेतकरी भाऊसाहेब जगताप, सिद्धार्थ जगताप, राजेंद्र कुलकर्णी यांच्या समोर पंचनामा करण्यात आला. त्यात कंपनीचे बियाणे सदोष आढळून आले. 

शेतकऱ्याच्या जमिनीवर कांद्याची केवळ पंधरा ते वीस टक्के उगवण झाल्याचे निदर्शनास आले. तसा अहवाल देण्यात तक्रार निवारण समितीने दिला आहे. अहवालाच्या अनुषंगाने  जगताप यांनी पोलिस ठाण्यात तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.