शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नगर बाजार समितीत कांद्यावरुन पुन्हा वांदा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 17:44 IST

नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात आज कांद्याचे भाव कोसळल्याने संतप्त शेतक-यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले.

ठळक मुद्दे कांद्याचे भाव घसरलेशेतकरी संतप्त शेतक-यांकडून लिलाव बंद करून रास्ता रोको 

अहमदनगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात आज कांद्याचे भाव कोसळल्याने संतप्त शेतक-यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले. तसेच बाह्यवळण रस्त्यावर चक्काजाम केला. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. भाव कोसळल्यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांच्यातही चांगलाच राडा झाला.

आज नेप्ती उपबाजार येथे कांद्याचे लिलाव सुरु झाले. लिलावात कांद्याचे भाव १८०० रुपये ते २१०० रुपये प्रती क्विंटल निघाल्याने कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले. त्यांनी कांद्याचे भाव २६०० असल्याचे सांगितले. मागील वेळी भाव २६०० रुपये होता तो आज २१०० पर्यंत कसा उतरला असा सवाल शेतक-यांनी उपस्थित केला. तफावत कशी असे म्हणून शेतक-यांनी लिलाव प्रक्रिया बंद केली. या दरम्यान काही शेतकरी व कांदा व्यापारी यांच्यात हमरीतुमरी झाली. त्यानंतर संतप्त शेतक-यांनी पुन्हा बाह्यवळण मार्गावर ठिय्या मांडून रास्ता रोको सुरु केले. यामुळे लिलाव बंद राहिले. हा गोंधळ दिवसभर सुरु होता. बाजार समितीचे सचिव अभय भिसे, सभापती विलास शिंदे, उपसभापती रेवणनाथ चोभे यांनी शेतक-यांशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र शेतक-यांनी माघार घेतली नाही.शेवटी आ.शिवाजी कर्डिले आणि आ.संग्राम जगताप हे नेप्ती उपबाजारात आले. त्यांनी व्यापारी, शेतकरी, बाजार समितीचे संचालक यांची संयुक्त बैठक घेतली. त्यात इतर बाजार समितीच्या भावांचा आढावा घेण्यात आला. बाजार समितीच्या अधिकार्यांशी चर्चा करुन भावाचा आढावा घ्यावा. एकदम लिलाव प्रक्रिया बंद करून रास्ता रोको करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर लिलाव प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरु झाली.

बाजार समितीत आज चांगल्या प्रतीच्या कांद्याला २१०० रुपये पर्यंत भाव मिळाला.  इतर बाजार समितीमधील भाव याच सरासरीचे आहेत. काही मोजके लोक लिलाव प्रक्रिया बंद करून इतर शेतक-यांना वेठीस धरत आहेत, असे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.