नगरपालिकेविरुध्द एकतर्फी मनाई
By admin | Updated: April 18, 2017 17:12 IST
शहरातून जाणारा पुणे-नाशिक महामार्ग तसेच कोल्हार-घोटी राज्यमार्गालगतच्या टपरीधारक व्यावसायिकांच्या टपºया हटविण्याच्या संगमनेर नगरपालिकेच्या कारवाईस न्यायालयाने स्थगिती दिली.
नगरपालिकेविरुध्द एकतर्फी मनाई
संगमनेर: शहरातून जाणारा पुणे-नाशिक महामार्ग तसेच कोल्हार-घोटी राज्यमार्गालगतच्या टपरीधारक व्यावसायिकांच्या टपºया हटविण्याच्या संगमनेर नगरपालिकेच्या कारवाईस न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे टपरीधारकांना दिलासा मिळाला आहे.पुणे-नाशिक महामार्ग व कोल्हार-घोटी राज्यमार्गालगतच्या टपºया बाजूला करुन जागा मोकळी करण्याची तयारी संगमनेर नगरपालिकेने केली होती. यासंदर्भात टपरीधारकांनी दिवाणी न्यायालयात धाव घेत नगरपालिकेविरुध्द मनाई हुकूम मिळविण्यासाठी दावा केला होता. टपरीधारकांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने नगरपालिकेविरुध्द एकतर्फी मनाई हुकूम दिला. यामुळे टपरीधारक छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला. शहरातील टपरीधारकांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत नगरपालिका प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी समज दिली होती. प्रशासनाने जागेवर जाऊन खुणा करुन दिल्या होत्या. टपरीधारकांनी एकत्र येऊन संगमनेर दिवाणी न्यायालयात अॅड.संग्राम जोंधळे व विशाल जाधव यांच्यामार्फत मनाई हुकूमाचा दावा दाखल केला होता. १९८६ पासून म्हणजे गेल्या २० -२१ वर्षांपासून हे छोटे व्यावसायिक टपरीच्या माध्यमातून व्यवसाय करीत असून हे त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. नगरपालिका क्षणात टपºया नष्ट करुन टपरीधारकांचे संसार उद्ध्वस्त होतील, तसेच नगरपालिकेने अतिक्रमण हटवण्यासाठी कायदेशीर बाजूंचा अवलंब केला नाही, असा युक्तीवाद टपरीधारकांच्या वतीने वकिलांनी केला. न्यायालयाने टपरीधारकांची बाजू समजून घेत नगरपालिकेविरुध्द एकतर्फी मनाई हुकूम दिला. टपरीधारकांची दुकाने पाडू नयेत व त्यांना बेदखल करु नये असे स्पष्ट करण्यात आाल्याची माहिती अॅड.जोंधळे यांनी दिली.