शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरात एक हजार किलो गोवंशाचे मांस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 14:39 IST

कत्तलखान्यावर शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही घटना शनिवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास भारतनगर परिसरातील जमजम कॉलनी (गल्ली क्रमांक नऊ) येथे घडली. घटनास्थळावरून पोलिसांनी तीन वाहनांसह एक हजार किलो गोवंशाचे मांस जप्त केले.

ठळक मुद्दे पोलिसांची कारवाई ५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल

संगमनेर(जि. अहमदनगर) : कत्तलखान्यावर शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही घटना शनिवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास भारतनगर परिसरातील जमजम कॉलनी (गल्ली क्रमांक नऊ) येथे घडली. घटनास्थळावरून पोलिसांनी तीन वाहनांसह एक हजार किलो गोवंशाचे मांस जप्त केले. याप्रकरणी तीन जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल सचिन कचरू उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कमरअली सौदागर व त्याचे तीन साथीदार (नावे माहित नाहीत) अशा एकूण चार जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झालेले सर्व संशयीत आरोपी पसार झाले आहेत. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांना भारतनगर परिसरातील जमजम कॉलनी येथे गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती शुक्रवारी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास मिळाली. त्यानंतर तात्काळ त्यांनी घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याच्या पथकासह छापा टाकला. पोलीस आल्याचे पाहून गुन्हा दाखल झालेले सर्व संशयीत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी तेथून १ लाख रूपयांचे एक हजार किलो गोवंश जनावरांचे मांस, चार लाख रूपये किंमतीचे चारचाकी वाहन (एम.एच. ०१, बी. टी. ६७९४), पन्नास हजार रूपये किंमतीची रिक्षा (एम. एच. १२ जे. ५३९८) व चाळीस हजार रूपये किंमतीची मोटारसायकल (एम. एच. १७, ए. टी. ९६४३) असा एकूण ५ लाख ९० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक पंकज निकम, ईस्माइल शेख, सचिन उगले, सागर धुमाळ, अजय आठरे, सुनील ढाकणे यांचा समावेश होता. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर