शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

कागदावरच्या एक हजार सहकारी संस्था गुंडाळल्या

By admin | Updated: April 28, 2016 23:16 IST

ज्ञानेश दुधाडे, अहमदनगर राज्यात भाजप सरकार आल्यानंतर पहिल्यांदा सहकार खात्याच्या शुध्दीकरणाचा निर्णय घेण्यात आला.

ज्ञानेश दुधाडे, अहमदनगरराज्यात भाजप सरकार आल्यानंतर पहिल्यांदा सहकार खात्याच्या शुध्दीकरणाचा निर्णय घेण्यात आला. यानुसार तत्कालीन सहकार आयुक्त यांनी १७ जून २०१५ ला जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. यात सहकार खात्याने जिल्ह्यातील ५ हजार ४८० संस्थांचे सर्वेक्षण केले. यात १ हजार २५८ सहकारी संस्था कागदोपत्री आढळून आल्या आहे. यातून १ हजार १ सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आलेली आहे.राज्याच्या नकाशावर सहकाराचा बालेकिल्ला असणाऱ्या नगर जिल्ह्यात १ हजार २५८ सहकारी संस्था नावाला आढळून आल्या आहेत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने ३१ मार्च २०१६ ला जिल्ह्यातील ५ हजार ४८० संस्थांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. यात १ हजार २५८ सहकारी संस्था कागदोपत्री, १२३ संस्थांचा पत्ताच सापडला नाही. या सर्व १ हजार ३६४ संस्था अवसायानात काढण्याचे आदेश दिलेले आहेत. सहकार खात्याने गेल्या वर्षभरात केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील संस्थांचे लेखा परीक्षण झाले की नाही, त्यांची आॅनलाईन नोंदणी झालेली आहे की नाही, संस्थेचे दप्तर कोणाच्या ताब्यात आहे, संंबंधित संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा होतात की नाही, संस्थेच्या नोंदणी असलेल्या जागेवर संस्था प्रत्यक्षात अस्तिवात आहे नाही याचा शोध घेण्यात आला. यात जिल्ह्यातील कागदोपत्री सहकारी संस्थांची माहिती समोर आली आहे. अवसायानात काढण्याचे आदेश दिलेल्या सहकारी संस्थांचे व्यवहार पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यानंतर संबंधित संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. नोंदणी रद्द करण्यात आलेल्या संस्थांचे व्यवहार पूर्ण करण्यात आल्याची माहिती दिली.सरकारच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे ३१ मार्च २०१६ पूर्वी सर्वेक्षण पूर्ण करण्यात येऊन पुरावा नसणाऱ्या, कागदोपत्री अशा १ हजार १ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. दिगंबर हौसारे, उपनिबंधक, अहमदनगर.नोंदणी रद्द केलेल्या संस्थानगर ११८, संगमनेर ५८, अकोले १४०, कोपरगाव ५३, राहाता ५३, राहुरी ५५, श्रीरामपूर ४६ , नेवासा ३२, शेवगाव २८, पाथर्डी २५, जामखेड २७, कर्जत ५८, श्रीगोंदा १६९, पारनेर ११९ अशा आहेत.