शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

एकच प्रश्ऩ़ आमच्या शेतकरी बापानं जगायचं कसं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 11:38 IST

अरुण वाघमोडे अहमदनगर : ‘कळत्या वयापासून शेतात राबणा-या आई-बापांना पाहिलं. दिवसरात्र कष्ट करूनही हातात चार पैसेही पडत नाहीत़ माझ्याच ...

ठळक मुद्दे उपोषणकर्त्या शुभांगीने मांडली शेतक-याची व्यथा

अरुण वाघमोडेअहमदनगर : ‘कळत्या वयापासून शेतात राबणा-या आई-बापांना पाहिलं. दिवसरात्र कष्ट करूनही हातात चार पैसेही पडत नाहीत़ माझ्याच बापाची नव्हे तर सा-या शेतक-यांचीच ही व्यथा़ शाळेच्या ‘फी’साठी बापाकडे पैसे मागताना जीव कासावीस होतो़ या व्यवस्थेत आमच्या शेतकरी बापानं जगायचं कसं अन् कुटुंबाचं पालन करायचं कसं? या एकाच प्रश्नाचा सरकारला जाब विचारण्यासाठीच आम्ही तिघी मैत्रिणींनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे़ आमच्या आंदोलनाचा शेवट काय होईल हे माहित नाही़़़पण शेतकºयाची कन्या आता जागृत होऊन सरकारला जाब विचारत आहे हे तरी सर्वांना समजेल’ अशी वेदना पुणतांबा येथे शेतकºयांच्या प्रश्नासाठी उपोषण करत असलेल्या शुभांगी संजय जाधव या शेतकरी कन्येने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली़पुणतांबा (ता़ राहाता) येथे गेल्या पाच दिवसांपासून शेतक-यांच्या प्रश्नांसाठी शुभांगीसह निकिता धनंजय जाधव व पूनम राजेंद्र जाधव या शेतकºयांच्या मुलींनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे़ शुभांगी हिची प्रकृती खालावल्याने तिला गुरूवारी रात्री जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ शुभांगीने मात्र रूग्णालयातही उपोषण सुरूच ठेवले आहे़ सरकार जोपर्यंत सर्व मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत अन्नाचा कणही घेणार नाही असा निश्चय शुभांगी हिने केला आहे़शुभांगी हिने सांगितले की, सरकारचे प्रतिनिधी येतात आणि उपोषण मागे घ्या़़ अशी विनंती करतात़ मात्र ‘सर्व मागण्या मान्य केल्या आहेत’ असे लेखी आश्वासन कुणीच देत नाहीत़ आम्ही तिघी मैत्रिणींचे आई-वडील शेती करतात़ शेतकºयांची व्यथा आणि वेदना आम्ही बालपणापासून पाहत आहोत. उपोषणाचा निर्णयही आमचा तिघींचाच होता़ शेतकºयांसाठी उपोषण करा असे आम्हाला कुणीही सुचविले नव्हते़ आम्हाला उपोषण करताना पाहून आमच्याच नव्हे तर सर्वच शेतकरी माता-पित्यांचा जीव तीळ-तीळ तुटत आहे. उपोषण मागे घ्या अशी विनवणी प्रत्येक जण करत आहे़ पण शेतकरी बापासाठी अन्नत्याग करण्याचा निश्चय केला आहे़ यापासून आम्हाला आता कुणी रोखू शकत नाही़. सरकारला खरंच शेतक-यांची काळजी असेल तर मागण्यांची पूर्तता करून अंमलबजावणी करावी़ तेव्हा उपोषण मागे घेऊ़कोण आहेत या कृषिकन्याशुभांगी ही कोपरगाव येथील एस़एस़जी.एम महाविद्यालयात एस.वाय.बी.एस्सीचे शिक्षण घेत आहे़ पूनम शुभांगीच्याच वर्गात आहे तर निकिता ही पुणे येथे ‘लॉ’चे शिक्षण घेत आहे़ या तीनही मुली १९ ते २० या वयोगटातील असून, त्यांचे आई-वडील पुणतांबा येथे शेती करतात़शेतक-यांचे दु:ख समजण्याइतपत आम्ही मोठ्या आहोतआमच्या मायेपोटी बहुतांश जण सांगतात की, तुम्ही अजून लहान आहात़ आधी शिक्षण करून घ्या मग आंदोलन करा, पण शेतकºयांचं दु:ख समजण्याइतपत आम्ही नक्कीच मोठ्या आहोत़ शेतकºयांच्या प्रश्नांसाठी उद्या महाराष्ट्रातील सर्व कृषिकन्या बाहेर पडल्या तर आमच्या आंदोलनाचे हे मोठे फलित असेल असे शुभांगी हिने सांगितले़जगणं सुकर व्हावं याच मागण्याशेतकरी या सरकारकडे फुकट काहिच मागत नाही़ शेती करून किमान स्वाभिमानाने जगता यावे याच आमच्या मागण्या आहेत़ शेतकºयांचा सातबारा कोरा करावा, संपूर्ण कर्जमाफी, कृषीसंलग्न वस्तूंवरील जीएसटीतून माफी, सिंचन, शेती अवजारांना शंभर टक्के अनुदान, शेतीमालाला हमीभाव, दुधाला योग्य दर अशा आमच्या मागण्या असल्याचे शुभांगी हिने सांगितले़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर